रमजान महिना सुरू आहे. या काळात जवळपास सर्व मुस्लिम उपवास करतात. इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजान आजपासून म्हणजेच 12 मार्चपासून सुरू झाला आहे. इस्लामिक कॅलेंडरच्या नवव्या महिन्याला रमजान महिना म्हणतात. इस्लाम धर्मात माह-ए-रमजान किंवा रमजान महिना खूप खास आहे. या पवित्र महिन्यात मुस्लिम उपवास ठेवतात आणि अल्लाहची उपासना करतात. यावेळी रमजान 11 मार्च 2024 पासून सुरू होत असून 9 एप्रिल 2024 पर्यंत चालणार आहे. रमजानमध्ये रोजाचे उपवास धरले जातात. रमजानचा महिला संपल्यावर ईद साजरी केली जाते. रमजान हा मुस्लिम समाजाचा सण, उत्सव असला तरीही प्रत्येकाने या सणाबाबत माहिती जाणून घेणे महत्त्वाची आहे. 


रमजानबाबत माहित नसलेल्या 10 गोष्टी 


1. प्रत्येक मुस्लिम रमजान महिन्यात उपवास करतो. लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध वगळता.
2. या महिन्यात संध्याकाळच्या इफ्तारचा खास पदार्थ म्हणजे खजूर. प्रेषित मोहम्मद यांनीही खजूर खाऊन उपवास तोडला, अशी यामागची धारणा आहे.
3. रमजान महिना 30 दिवस चालतो आणि दररोज उपवास केला जातो. असे मानले जाते की, या महिन्यात दररोज कुराण वाचल्याने अधिक पुण्य मिळते
4. रमजान महिन्याचे तीन भाग केले जातात. 10 दिवसांचा पहिला भाग 'दयेचा कालावधी' म्हणून वर्णन केला आहे. 10 दिवसांच्या दुसऱ्या भागाला 'माफीचा कालावधी' आणि 10 दिवसांच्या शेवटच्या भागाला 'नरकापासून मुक्तीचा कालावधी' म्हणतात.
5. रोजा दरम्यान, मुस्लिम खाण्यापिण्यापासून दूर राहतात आणि लैंगिक संबंध, अपमानास्पद भाषा आणि राग यापासून देखील परावृत्त करतात. या काळात कुराण वाचून आणि सेवा करून अल्लाहचे ध्यान केले जाते.
6. शब-ए-कद्र हा रमजान महिन्यातील एका दिवशी साजरा केला जातो, जो यावेळी 11 जून रोजी आहे. या दिवशी सर्व मुस्लिम रात्रभर जागून अल्लाची पूजा करतात.
7. यावेळी रमजानमध्ये 5 शुक्रवार असतील. रमजानचा शेवटचा जुम्मा 15 जून रोजी असेल, ज्याला गुडबाय जुम्मा म्हणतात.
8. तुमच्या लक्षात आले असेल की, रमजानच्या प्रत्येक चित्रात एक कंदील असेल. या कंदिलाची कथा अशी आहे की, रमजानच्या महिन्यात लोक इजिप्तच्या बाजारपेठेत मोठे कंदील लावून रस्ते सजवतात. राजधानी कैरोमध्ये दिवे लावून इजिप्तच्या खलिफाचे स्वागत केले जाते, अशी यामागची धारणा आहे.
9. सूर्योदयापूर्वी सकाळच्या जेवणाने उपवास सुरू होतो ज्याला 'सुहूर' म्हणतात आणि सूर्यास्तानंतरच्या जेवणाला 'इफ्तार' म्हणतात.
10. रमजानला सत्कर्मांचा हंगाम आणि वसंत ऋतु देखील म्हटले जाते.