Holi Rangoli Designs 2024 : देशभरात होळीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. सण म्हटलं की घराची सजावट झालीच पाहिजे. दारात रांगोळी नसेल तर सणाचा उत्साह पूर्ण होत नाही. भारतात घरासमोरील अंगणात किंवा बिल्डिंगमधील घरासमोर छोट्या खानी जागेत रांगोळी आजही काढली जाते. भारतीय संस्कृतीत रांगोळीला अतिशय शुभ मानलं जातं. देवदेवतांसह पाहुण्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढली जाते. एवढंच नाही तर धर्म कार्यातही रांगोळी काढण्याची परंपरा आहे. खरं तर भारतीय संस्कृतीत रांगोळीशिवाय कुठलंही शुभ कार्य हे पूर्ण होत नाही. (Rangoli Design For Holika Dahan at Holi 2024 )


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


होळीचा सणासाठी घराची शोभा अधिक खुलण्यासाठी अंगणात होळीशी संबंधित रांगोळी काढा. अंगणात तुम्ही सुंदर आणि आकर्षक अशी रंगांची रांगोळी किंवा विविध फुलं, पानांची रांगोळी काढू शकता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


होळीच्या दिवशी तुम्ही सुंदर अशी नक्षीकाम रांगोळीदेखील काढू शकता. होळीचा उत्साह हा रंगांचा उत्साह असल्याने रांगोळीतील रंगाने होळीचा आनंद आणखीन खुलून जाईल. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आज सोशल मीडिया आणि गुगल सर्चमध्ये होळी रांगोळी डिझाईन्स टाकलं तर तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतात. 



जर तुम्ही होळी खेळत नसाल तर रांगोळीच्या रंगासोबत दारात सुंदर आणि सोपी रंगोळी काढून होळीचा आनंद साजरा करा. 



होलिका दहनसाठीही खास अशी रांगोळी डिझाईन्स तुमचं मन जिंकेल नक्की. 



होलिका दहनसाठी एक आणि दुसऱ्या दिवशी धुरवड किंवा धुलिवंदनासाठी एक अशी रांगोळी तुम्ही काढू शकता. 



तुम्हाला आवडलेली डिझाईन्स सर्वप्रथम खडू किंवा पेन्सिलने रेखाटून घ्या म्हणजे तुम्हाला रांगोळी काढणं सोप जाईल. 



दिवा आणि घरातील अनेक गोष्टीने तुम्ही ही रांगोळी अजून आकर्षित करु शकता. 



तुमच्या दारातील रांगोळी पाहून प्रत्येकाचं मन प्रसन्न होईल. घरातही सणाचा आनंद द्विगुणीत होईल. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 (@decor.diy.den)


तुम्ही अगदी घरातही टेबलवर होलिका दहनासंबंधित रांगोळी काढू शकता.