आज 7 फेब्रुवारी रोजी रोझ डेसोबत व्हॅलेंटाईन आठवड्याला सुरुवात झाली आहे. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस साजरा केला जाणार आहे. रोझ डेच्या दिवशी पार्टनरला गुलाब देऊन प्रेमाचा दिवस साजरा केला जात आहे. असं असलं तरी, या दिवशी नेहमीपेक्षा खूपच महाग दराने गुलाब विकले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की, लोक जगातील सर्वात महागड्या गुलाबाच्या फुलाला कोणत्या नावाने संबोधतात?


गुलाबाच्या किंमतीत येतील 4 मोठे बंगले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात गुलाबाच्या फुलांचे हजारो प्रकार आहेत. पण, ज्युलिएट गुलाब हे असं गुलाब आहे, जो त्याच्या सुगंध, सौंदर्य आणि किंमतीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या गुलाबाच्या किंमतीत मर्सिडीज, ऑडी आणि BMW सारख्या महागड्या कार आणि तीन बंगले देखील खरेदी करु शकता. हे गुलाब खरेदी करताना अनेकदा विचार करायला लागेल.  तर या रोजच्या दिवशी जाणून घेऊया या गुलाबाच वैशिष्ट्य काय आहे आणि ते इतके महाग का आहे? या गुलाबाची किंमत 130 कोटी रुपये आहे. जुलियट गुलाबाची माहिती सगळ्यात अगोदर 2006मध्ये कळली. 



सौंदर्य वेड लावतं 


लोकप्रिय गुलाब ब्रीडर डेविड ऑस्टिनने जगासमोर आणलं. डेविड यांनी अनेक गुलांबांना मिळून याची लागवड केली. तेव्हा याचा दर 90 कोटी इतका होता. हे गुलाब अतिशय सुंदर आहे. या गुलाबामध्ये असे काय आहे ज्यामुळे त्याची किंमत इतकी जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे या गुलाबाची वाढ होण्यासाठी 15 वर्षांचा कालावधी लागतो. एवढंच नव्हे तर 5 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 34 रुपये खर्च होतो. डेविड ऑस्टिन या वेबसाइटनुसार, जुलियट गुलाबाला हलका चहा सारखा सुंदर सुगंध आहे. 


का साजरा केला जातो दिवस 


या दिवशी एकमेकांना गुलाब देऊन प्रेम व्यक्त केलं जातं. आपण ज्या नात्याला अधिक महत्त्व देतो त्यांच्यासमोर अशापद्धतीने व्यक्त केलं जातं. अनेकांना वाटतं की, हा दिवस फक्त प्रेमींसाठी आहे. तर असं अजिबातच नाही. 


अशी झाली रोझ डेची सुरुवात 


रोझ डेच्या दिवशी कपल्स एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात, पण या दिवसाची सुरुवात मुघल काळापासून झाली आहे. असे म्हणतात की, मुघल बेगम नूरजहाँ यांना लाल गुलाबाची खूप आवड होती. त्यांना खूश करण्यासाठी जहांगीर त्याला रोज टनमध्ये ताजे गुलाब पाठवत असे. त्याचवेळी असे देखील म्हटले जाते की, राणी व्हिक्टोरियाने तिचे पती प्रिन्स अल्बर्ट यांना प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब दिले होते. राणी व्हिक्टोरियाच्या काळापासून, लोकांनी आपल्या प्रियजनांना प्रेम व्यक्त करण्यासाठी 7 फेब्रुवारीला गुलाब देण्यास सुरुवात केली आणि ही परंपरा आजही सुरू आहे.