आपल्या देशात अशी अनेक गाव आहेत जिथली संस्कृती आणि राहणीमान हे भारताच्या इतर भागांच्या तुलनेत एकदम वेगळे असते. यापैकीच महाराष्ट्रातील शेटफळ हे गाव असून यागावातील लोक त्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर हे पाळीव प्राणी नाही तर चक्क 'साप' पाळतात. या गावातील लोक पाळीव सापांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात. 


सापांचं गाव : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेटफळ हे गाव महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील असून या गावातील जवळपास प्रत्येक घरामध्ये तुम्हाला साप आढळून येतील. साप फक्त लोकांच्या घरातच नाही तर शेतामध्ये, झाडांवर तसेच बेडरूममध्ये सुद्धा आढळून येतात. या गावातील लोक सापांना अजिबात घाबरत नाहीत. शेटफळ गावातील मोठ्या माणसांसह लहान मुलं सुद्धा या सापांशी न घाबरता खेळताना दिसतात, तसेच त्यांना दूध सुद्धा पाजतात. 



गावातील लोक साप का पाळतात? 


सोलापुरातील शेतफल या गावातील लोकांचं म्हणणं आहे की साप हे भगवान शिव यांचं प्रतीक आहे, म्हणून ते सापांची पूजा करतात आणि त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात. तसेच या गावातील अनेक मंदिरांमध्ये सापांची पूजा केली जाते. शेटफल गावातील ओक सांगतात की, त्यांच्या पूर्वजांनी साप पाळणे सुरू केले होते, तेव्हा पासून ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली. शेटफळ गावातील लोकांना साप पकडणे आणि त्यांना पाळणे याबाबत योग्य माहिती आहे. यागावातील लोक सापांना कसं सांभाळायचं हे लहानपणापासूनच शिकतात. 


हेही वाचा : PHOTO: AC च्या रिमोटमध्येच लपलंय लाईट बील वाचवण्याचं बटण! तुम्हाला सापडलं का?


सर्पदंशाला घाबरत नाहीत लोक : 


तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की गावात प्रत्येक ठिकाणी अनेक साप असूनही येथील नागरिक सर्पदंशाला घाबरत नाहीत. गावकाऱ्यांचं म्हणणं आहे की, साप त्यांना कधीच चावत नाहीत. ते म्हणतात साप सुद्धा माणसांप्रमाणेच एक जीव आहेत त्यांना प्रेम आणि सन्मान दिला गेला पाहिजे. शेटफळ गाव हे याच कारणांमुळे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. गावातील लोक पर्यटकांना सापांबद्दल सांगतात आणि त्यांना कसे हाताळायचे याविषयी माहिती देता.