Shikhar Dhawan : भारतीय सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) चा नुकताच पत्नी आयशासोबतच्या घटस्फोटाला परवानगी मिळाली आहे. न्यायालयाने यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली आहे.(Shikhar Dhawan Divorce) शिखर धवन गेल्या काही दिवसापासून भारतीय संघातूनही लांब आहे. यासोबत त्याच्या खासगी आयुष्यातही तो अनेक कठीण परिस्थितींचा सामना करत आहे. धवनने मंगळवारी मुलगा झोरावर (Zoravar) सोबत व्हिडीओ कॉलवर गप्पा मारल्या. हा क्षण शिखरसाठी अतिशय भावूक होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाने नुकतेच आपल्या निर्णयात म्हटले होते की धवन आपल्या मुलासोबत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहू शकतो आणि तो आपल्या मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो. मात्र मंगळवारी धवनने आपल्या मुलाशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला तेव्हा तो खूप भावूक झाला.


टीम इंडियामध्ये 'गब्बर' या नावाने प्रसिद्ध असलेल्या धवनने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये एका बाजूला त्याचा मुलगा झोरावर तर दुसऱ्या बाजूला धवन हसताना दिसत आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करताना त्याने गुलजारच्या ओळी लिहिल्या, 'एक अजीब सी बेताबी है तेरे बिन…रह भी लेते हैं और रहा भी नहीं जाता.”



बाप-लेकाचं नातं 


बाप-लेकाचं नातं कायमच खास असतं. या नात्यातील भावना अनेकदा अबोलच असतात. पण जेव्हा त्या व्यक्त होतात तेव्हाच डोळे पानावल्याशिवाय राहत नाही. शिखर आणि झोरावरचं नातं देखील काहीसं तसंच आहे. या नात्यात दडलंय अतिशय भावनिक ओलावा. प्रत्येक मुलगा आणि त्याच्या बाबाचं नातं हे असंच शिखर-झोरावर सारखंच असतं यात शंका नाही. 


व्हिडीओवर प्रतिक्रिया 


धवनच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. नुकतेच दिल्लीच्या पटियाला हाउस फॅमिली कोर्टाने धवन आणि आयशा मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली होती. घटस्फोट मंजूर करताना पत्नीने मानसिक क्रूर कृत्य केल्याचे न्यायालयाने मान्य केले. आयशा आणि शिखरचे ओळख ही हरभजनमुळे झाली होती. 


नुकताच झाला घटस्फोट 


आयशाला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. शिखर आणि आयशा यांचा विवाह २०१२ मध्ये झाला होता. आयशा धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. ती सध्या ऑस्ट्रेलियात राहते. आयशाकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. शिखर धवनचा मानसिक क्रूरतेच्या त्रासामुळे घटस्फोट झाला आहे. कायद्यानुसार मानसिक क्रूरता म्हणजे काय? हे देखील समजून घेण्यासाठी यावर क्लिक करा.