बॉक्सर राहिलेल्या आयशाने शिखर धवनला नेमका कसा त्रास दिला, हरभजनची काय होती भूमिका?

Shikhar Dhawan Divorce : शिखर धवन आणि पत्नी आयशा मुखर्जीचा घटस्फोट झाला आहे. आयशाने शिखरचा मानसिक छळ केला. एकेकाळी प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांमध्ये नेमकं काय झालं? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 11, 2023, 01:18 PM IST
बॉक्सर राहिलेल्या आयशाने शिखर धवनला नेमका कसा त्रास दिला, हरभजनची काय होती भूमिका? title=

Shikhar Ayesha Divorce Reason : भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवन गेल्या अनेक दिवसापासून टीम इंडियापासून आहे. तसेच वनडे वर्ल्ड कपमध्ये देखील भारतीय संघात त्याला जागा मिळाली नाही. करिअरमध्ये वातावरण थोडं बिघडलेलं असताना खासगी जीवनातही मोठा भूकंप आला आहे. शिखर धवनने पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतला आहे. प्रदीर्घ काळापासून घटस्फोटाची लढाई सुरू होते अखेर दोघे कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळे झालेत. 

दिल्लीतील पटियाला हाऊस फॅमिली कोर्टात शिखर धवनचा घटस्फोट मंजूर करण्यात आला. यासोबतच आयशाने शिखर धवनचा मानसिक छळ केल्याचेही कोर्टाने मान्य केले. आयशाने शिखर धवनला नेमका त्रास काय दिला ते जाणून घेऊया. 

अशी झाली होती ओळख 

शिखर धवनपेक्षा आयशा 10 वर्षांनी मोठी आहे. आयशाचं हे दुसरं लग्न असून शिखर तिच्या प्रेमात पडला होता. या दोघांची ओळख फेसबुकवर झाली होती. आयशाला बघताच क्षणी शिखर तिच्याकडे आकर्षित झाला होता. शिखरने आयशाला फेसबुक रिक्वेस्ट पाठवली एवढंच नव्हे तर आयशाने देखील ही रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर दोघांमध्ये चॅट सुरू झालं आणि एकमेकांमध्ये चांगली मैत्री झाली. शिखर आयशाला पाहताच क्षणी क्लीन बोल्ड झाला होता. पण प्रपोझ करायला घाबरत होता. 

हरभजनची महत्त्वाची भूमिका 

आयशा मुखर्जी हरभजन सिंहची फेसबुक मैत्रिण होती. शिखर धवनने तिचे फोटो पाहताच प्रेमात पडला होता. आपलं प्रेम व्यक्त करण्याची हिंमत शिखरमध्ये नव्हती तेव्हा हरभजनने महत्त्वाची भूमिका बजावली. शिखरने आपल्या मनातील गोष्ट हरभजन मार्फत आयशापर्यंत पोहोचवली. 

शिखरचा छळ 

शिखर धवनला पत्नी आयशाकडून मानसिक छळ देण्यात आला. तसेच 10 वर्षांचा मुलगा जोरावरपासून वेगळं ठेवून मानसिक छळ केल्याचा आरोप शिखरने केला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोर्टाने देखील आयशा शिखरसोबत क्रूर वागत असल्याचे मान्य केले. आयशाने शिखरला मुलापासून तब्बल 1 वर्ष दूर ठेवले. महत्त्वाचं म्हणजे आयशाने या आरोपांचे खंडन केले नाही. भारतात स्थायिक होण्याचं सांगून आयशाने दिला दगा. पहिला पतीला दिलेल्या कमिटमेंटमुळे ती ऑस्ट्रेलिया सोडू शकली नाही. 

एकेकाळी प्रेमात आकंठ बुडाले होते 

आयशा शिखरला भेटण्यापूर्वीच विवाहित होती. एवढंच नव्हे तर आयशा शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. पहिल्या पतीकडून तिला दोन मुली होत्या. हे सगळं माहित असूनही शिखरने आयशाशी लग्न केलं. कुटुंबाने सुरुवातीला विरोध करून शिखरच्या लग्नाला परवानगी दिली. 2009मध्ये साखरपुडा करून दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. दोन वर्षांनी दोघांना मुलगा झाला. मात्र सप्टेंबर 2020 मध्ये दोघं एकमेकांपासून वेगळे झाल्याची माहिती स्वतः आयशाने शेअर केली. आणि 4 ऑक्टोबर 2023 रोजी दोघांचा घटस्फोट झाला.