महाराजांवर नितांत दृढभाव असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी मुलांना दिलीत `ही` खास नावं, ज्याचा संबध थेट शिवरायांशी
Dr Amol Kolhe Baby Names in Marathi : मराठ्यांच साम्राज्य उभ्या करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती आहे. खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराजांशी संबंधित नावे मुलांना दिली आहेत. शिवजंयतीच्या निमित्ताने जाणून घेऊया खास नावे.
छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती तिथीनुसार 19 फेब्रुवारी 2024 संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. असं असताना महाराजांचा आदर्श प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. अनेकजण महाराजांचे विचार जीवनात आचरण करण्याचा प्रयत्न करतात तर काही जण शिवरायांना आपल्या मुलांच्या रुपात घरी पाहतात. तुम्हाला देखील मुलांना अतिशय प्रेरणादायी आणि हटके नाव द्यायचे असेल महाराजांच्या जीवनातील नावांचा विचार करायला हरकत नाही.
खा. डॉ. अमोल कोल्हे हे एक उत्कृष्ठ अभिनेते आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. अनेकदा ते महाराजांच्या जीवनावर भाष्य करत असतात. अमोल कोल्हे यांनी आपल्या दोन्ही मुलांना दिलीत अतिशय प्रेरणादायी नावे ज्यांचा संबंध थेट शिवरायांशी जोडला गेलाय.
अमोल कोल्हे यांच्या मुलीचे नाव
अमोल कोल्हे यांनी मुलीला नाव अतिशय गोड दिले आहे. 'आद्या' असं तीचं नाव आहे. आद्या या नावाचा अर्थ प्रथम शक्ती; देवी दुर्गा; पहिला; असमान; परिपूर्ण पृथ्वी असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामी तुळजाभवानी आईचंच एक रूप देवी दुर्गा आहे. त्यामुळे लेकीच्या नावाचा संबंध थेट शिवरायांशी आहे.
अमोल कोल्हे यांच्या मुलाचे नाव
खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या मुलाचे नाव 'रूद्र' असे आहे. 'रूद्र' हा महाराजांच्या अगदी शब्द.. महाराज कायमच आपल्या गळ्यात रूद्राक्षाची माळ घालत. तसेच रूद्र 'हे' नाव भगवान शिवाचे नाव आणि रूप देखील आहे. शिवरायांशी संबंधीत या नावांची निवड अमोल कोल्हे यांनी आपल्या मुलांसाठी केली आहेत.
(हे पण वाचा - Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीच्या शुभेच्छा... महाराजांचे प्रेरणादायी विचार Whatsapp, Status ला ठेवून साजरी करा शिव जयंती)
महाराजांच्या नावावरुन मुलींची नावे
शिवकन्या
शिवांगी
शिवश्री
शिवन्या
शिविका
शिवांजली
शिवानी
महाराजांच्या नावावरुन मुलांची नावे
शिवंकर
शिवानंद
शिवजित
शिवाक्ष
शिवराज
शिवांक
शिवेंद्र
शिवम
शिवतेज
शिवजित