अभिनेत्री सोनाली खरे आणि बॉलिवूड अभिनेता बिजय आनंद यांची लव्हस्टोरी अतिशय खास आहे. पहिल्यांदाच या दोघांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. सोनाली खरे आणि बिजय आनंद यांच्यात 8 वर्षांचं अंतर आहे. पण हे दोघं जण आपलं यशस्वी संसाराचा आनंद घेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत बोलताना बिजय आनंद यांनी नवरा-बायकोच्या भांडणात सासूची भूमिका कशी असावी? हे सांगितलं आहे. सोनाली आणि बिजय आनंद यांच्या लग्नाला 18 वर्षे झाली आहेत. मात्र कधीही या दोघांची भांडण झाली तर सोनालीची आई त्यामध्ये कधीच बोलत नाहीत. त्या सरळ आपल्या खोलीत जातात. आमची मुलगी देखील तसंच करत असल्याचं बिजय सांगतात. 



पुढे बिजय आनंद सांगतात की, कधीच नवरा बायकोच्या वादात पालकांनी बोलू नये. कारण पती-पत्नीचा वाद हा काही मिनिटांचा असतो. अगदी काही वेळाने तो वाद मिटून जातो. पण पालकांनी  खास करुन आईने त्या वादात सहभाग घेतल्यास तो वाद क्षमताना दिसत नाही. 


मुलीच्या संसारात आईची भूमिका 


प्रत्येक आईला आपल्या मुलीचं चांगलंच व्हाव असं वाटत असतं. पण आपण एका मर्यादेनंतर मुलीच्या संसारात बोलू नये, ही गोष्ट आईने समजून घ्यायला हवी. नवरा-बायकोतील वाद काही क्षणाचा किंवा दिवसांचा असतो पण त्यामध्ये इतर व्यक्तीने लुडबूड केल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. 


(हे पण वाचा - दिनेश कार्तिकने दुसऱ्यांदा मांडला संसार, नात्यात मुव्ह ऑन होणं किती गरजेचं)


आईने मुलीला कितीपत पाठिंबा द्या 


अनेकदा आई मुलीच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहते. पण नवरा-बायकोचा वाद झाल्यास कधीच मुलीची बाजू घेऊ नये. कारण अशाने मुलीचा चुकीच्या गोष्टीवर आत्मविश्वास वाढू शकतो. यामुळे मुलगी चुकीचा निर्णयही घेऊ शकतो. असं असताना पालकांनी स्वतःला लक्ष्मणरेषा आखावी. त्या मर्यादेनंतर मुलीच्या संसारात बोलू नये. 


सांभाळून घेण्याचा सल्ला 


प्रत्येक आईने मुलीला सुरुवातीची परिस्थिती समजून घेण्याचा सल्ला द्यावा. कारण परिस्थिती तशीच राहत नाही. सुरुवातीचा काळ तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळलात तर पुढे सुख, ऐश्वर्य तुमच्या घरी पाणी भरेल. मुलीला कोणताही सल्ला देताना आईने तिच्या मुलीसोबतच त्या मुलाचा देखील विचार करणे तितकाच गरजेचा आहे.