Rohan Murthy Son Name And Meaning : देशातील आयटी सेक्टरमधील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे को फाऊंडर एनआर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या घरी गोड बाळाचं आगमन झालंय. मुलगा रोहन मूर्ती आणि सून अपर्णा कृष्णन यांना मुलगा झाला आहे.  नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांना आधी दोन नातवंड आहेत. मूर्ती दाम्पत्य ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांच्या मुली कृष्णा सुनक आणि अनुष्का सुनक यांचे आजी-आजोबा आहेत.


मुलाचे नाव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई आणि मुलगा दोघेही निरोगी आहेत. मुलाचे नाव 'एकग्र' ठेवण्यात आले आहे. 'एकाग्र'चा संस्कृत अर्थ अटळ लक्ष आणि एकाग्रता असा आहे. महाभारतातील अर्जुनपासून प्रेरित होऊन मूर्ती कुटुंबाने मुलाचे नाव 'एकग्र' ठेवल्याचे बोलले जात आहे.


रोहन मूर्ती सोरोकोचे संस्थापक


नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती हे अमेरिकेतील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म सोरोकोचे संस्थापक आहेत. रोहनची पत्नी अपर्णा कृष्णन ही भारतीय नौदलाचे निवृत्त कमांडर केआर कृष्णन आणि एसबीआयची माजी कर्मचारी सावित्री कृष्णन यांची मुलगी आहे. भारतातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर अपर्णाने कॅनडातून पुढील शिक्षण घेतले. अपर्णा सध्या मूर्ती मीडियाची प्रमुख आहे.


2019 मध्ये रोहन-अपर्णाचे लग्न 


रोहन आणि अपर्णा यांचा विवाह डिसेंबर 2019 मध्ये एका साध्या सोहळ्यात झाला होता. या लग्नाला कुटुंबातील फक्त जवळचे नातेवाईक उपस्थित होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहन आणि अपर्णा 2016 मध्ये एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटले होते. त्यानंतर त्यांची मैत्री घट्ट झाली आणि २०१९ मध्ये या नात्याचे रुपांतर लग्नात झाले.


पहिल्या पत्नीपासून घटस्फोट


रोहनने 2011 मध्ये TVS मोटर्सचे चेअरमन वेणू श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी वेणू हिच्याशी पहिले लग्न केले. लग्नानंतर दोघेही 2013 मध्ये वेगळे राहू लागले आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2019 मध्ये रोहन आणि अपर्णाचे लग्न झाले.