Sunidhi Chauhan Weight Loss : सेलिब्रिटी म्हटल्यावर ते त्यांच्या दिसण्याकडे खूप लक्ष देतात. त्यात गायक म्हटल्यावर त्यांना तर त्यांच्या आवाजाची देखील काळजी घ्यावी लागते. आजकाल तर गायकही त्यांच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनकडे प्रचंड लक्ष देतात. तसंच काहीसं सुनिधी चौहानसोबत आहे. सुनिधी चौहानचे सतत लाइव्ह कॉन्सर्ट होतात. त्यात सुनिधीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. त्याशिवाय आता तिच्यात असलेली उर्जा पाहून सगळ्यांना आणखी आश्चर्य झालं. पण आधीची सुनिधी चौहान आणि आताची सुनिधी चौहान यात खूप फरक आहे. आता तिनं स्वत: च्या फिटनेसकडे जे लक्ष दिलं आहे. त्यावरून सगळ्यांना आता तिचं फिटनेस आणि डायट संबंधीत सीक्रेट्स शेअर केले आहेत. आता तिच्या फिटनेसचं सीक्रेट काय आहे ते समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनिधी चौहानचा फिटनेस ट्रेनर विराज सरमलकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वेटलॉस जर्नी आणि थोडक्यात ट्रान्सफॉर्मेशनवर वक्तव्य केलं आहे. विराजनं सांगितलं की सुनिधीनं तिच्या नव्या गाण्यासाठी ‘आंख’ साठी 10 दिवसात 5 किलो वजन कमी केलं. नेमकं तिचं सीक्रेट काय होतं ते जाणून घेऊया.


सुनिधीच्या फिटनेस ट्रेनरनं सांगितलं की ती 90 किलोचं वजन उचलायची, 70 किलो वजन घेऊन स्क्वाट करायची आणि पुल-अप्स देखील करायची. त्याशिवाय, ती एकावेळी 5 किलोमीटर 25 मिनिटात पळायची. सुनिधी चौहानचं म्हणणं आहे की फिटनेसचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डायट आहे. विराजनं सांगितलं की "सुनिधीनं कॅलरी कंट्रोल डायट फॉलो करते. ती एका दिवसात 1200 कॅलरी पेक्षा कमी घेते. सुनिधीनं याविषयी बोलताना सांगितलं की ती इंचरमिटेंट फास्टिंग करते. तिचा उद्देश हा फक्त वजन कमी करणं हाच आहे. त्याशिवाय लिवरला देखील तिला आरामा द्यायचा आहे. ती रोज 16 तास फास्टिंग करते आणि जेवढं काही खाण्याचं ठरवलं आहे ते 8 तासात खाते." 


हेही वाचा : 7 खलनायक आणि 1 हीरो, क्लायमॅक्समध्ये खलनायकाला मारतो छोटा मुलगा! आजही पाहिला जातो 'हा' चित्रपट


सुनिधी तिच्या दिवसाची सुरुवात ही अंड्यांपासून करते आणि कधी-कधी सॉरडो ब्रेडचा एक तुकडा देखील खाते. त्याविषयी सांगत तिच्या तिनं सांगितलं की "इंटरमिटंट फास्टिंग दरम्यान, तुम्हाला सगळ्यात जास्त प्रोटीन आणि फॅटनं दिवसाची सुरुवात करायची असते. कारण कार्बोहायड्रेट्सपेक्षा ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. जर मला भूक लागली तर मी जेवते. मला जवळपास 5 वाजता भूक लागते आणि त्यावेळी मी नट्स खाते. त्यामुळे पुढचे तीन तास मला भूक लागत नाही. जेव्हा मी वेट लिफ्टिंग करते आणि ते आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस असतं. तेव्हा मी एक प्रोटीन शेक देखील घेते. दिवसात सगळ्यात शेवटचं मी काही खात असेल तर ते संध्याकाळी 7:30 च्या आसपास."