नोकरी असो वा बिझनेस, शिवाजी महाराजांचे `हे` व्यावहारिक गुण तुमच्यात असायला हवेत..
Shivaji Maharaj Qualities For Everyone: छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, धोरण, साहस, मानवतावादी दृष्टिकोन असे अनेक गुण आजच्या तरुण पिढीमध्ये असणं फार गरजेचे आहे.
Shiv Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज (19 फेब्रुवारी) ला देशभरात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्थ जपणारे आणि महाराजांवर खूप प्रेम करणारे लोक या दिवशी उत्सव साजरा करतात. छत्रपती शिवाजी महाराज भोसले (1630 ते 1680) हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते. महाराजांनी1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबशी लढावे लागले. एवढेच नाही तर विजापुरला आदिलशहा आणि इंग्रजांशीही लढले. 1674 मध्ये रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतीशील प्रशासन स्थापन केले. त्यांनी युद्धक्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण संशोधने केली आणि युद्धशैलीची एक नवीन शैली, शिवसूत्र विकसित केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय व्यवस्था आणि न्यायालयीन शिष्टाचाराचे पुनरुज्जीवन केले. महाराजांमध्ये शौर्य, धैर्य, सकारात्मकता, मुत्सद्देगिरी, युद्धनीती, व्याहारिकता आणि चातुर्य असे अनेक गुण होते. आज देशाला तसेच आजच्या तरुण पिढीला महाराजांकडून खूप काही शिकण्याची गरज आहे. त्यांना प्रचंड दूरदृष्टी होती आणि त्या काळात त्यांनी दूरदृष्टीने भविष्याचा विचार करुन विविध योजना आखल्या होत्या. त्यांच्या या उत्तम व्यवस्थापन कौशल्याच्या वापर करुन त्यांनी यश देखील प्राप्त केले.
नवीन गोष्टी शिकण्याची सतत तयारी
कोणत्याही व्यक्तीला प्रगती करायची असेल तर त्यासाठी सतत जागरुक राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा बाळगून आणि त्यासाठी प्रयत्न करूनच माणूस प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकू शकतो. शिवाजी महाराजही सतत नवनवीन युद्धनीती शिकत राहिले आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत. त्यांना वेळोवेळी विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांची माहिती मिळाली आणि आपल्या सैनिकांकडे चांगली आणि योग्य अशी शस्त्रे असावीत ह्यावर त्यांचा कटाक्ष होता.राजमाता जिजाऊ, दादोजी कोंडदेव ह्यांच्यापासून ते समर्थ रामदास स्वामी हंच्यासारखे गुरू शिवाजी महाराजांच्या जीवनात होते आणि त्यांनी त्यांना वेळोवेळी स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली.
दूरदृष्टी
जवळपास संपूर्ण भारत मुघल आणि इतर मुस्लिम राज्यकर्त्यांच्या प्रभावाखाली असताना महाराजानी भविष्याचा विचार करून स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि सतत कष्टातून आपले स्वप्न पूर्ण केले. स्वतंत्र भारताची स्वप्ने बघून ते स्वप्न त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात देखील रुजवले. तसेच त्यांच्या शासनकाळात मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधणे, परकीय शत्रूंवर बारीक लक्ष ठेवणे, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग सारखे किल्ले बांधणे, आरमार उभारणे, परकीयांच्या डोळ्यात तेल घालणे आणि त्यांच्याशी चर्चा करणे, व्यवहार करणे अशी दूरदृष्टी होती. त्यांची दूरदृष्टी, कौशल्य, शक्ती वापरण्याची क्षमता, लोककल्याणकारी धोरणे, समर्पण, शौर्य आणि इतर सर्व गोष्टींसाठी आपल्याला खूप प्रशंसा मिळते.
आर्थिकदृष्ट्या
कोणत्याही व्यवसायासाठी आर्थिक भांडवल खूप महत्त्वाचे असते. त्यांच्या काळात महाराजांनी उत्कृष्ट आर्थिक व्यवस्था केली आणि मोठमोठ्या मोहीम यशस्वी केल्या. त्यांच्या कोणत्याही मोहिमेसाठी ते फक्त कमी खर्चाच मॅनेज होऊ शकतील अशीच माणसे बरोबर घ्यायचे. त्यांचे गुप्तहेर खाते खूप चांगले होते. गुप्तहेर मंडळी मोहीम आखण्याचा आधी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन, स्पॉट ॲनालिसिस करून महाराजांपर्यंत सर्व माहिती पोहोचवून एक मोहीम राबवली जायची. मग महाराज त्या मोहिमेची आखणी करत आणि योग्य नियोज करत.