`ती आमची महालक्ष्मी...` टीना अंबानींनी सासूबद्दल व्यक्त केल्या खास भावना, सासू-सुनेच्या नात्याचं गुपित
Tina Ambani Post For Kokilaben Ambani : अंबानी कुटुंबातील सून आपल्या सासूवर किती मनापासून प्रेम करते, हे टीना अंबानी यांनी एका पोस्टमधून व्यक्त केलं आहे.
अंबानी कुटुंबातील प्रमुख असलेल्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी यांजा आज वाढदिवस. या निमित्ताने अभिनेत्री आणि अंबानी कुटुंबातील धाकटी सून आहे. टीना अंबानी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर खास सासूसाठी पोस्ट केली आहे. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने टीना अंबानी यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. सासू-सुनेचं नातं किती घट्ट असावं याचं हे उत्तम उदाहरण आहे.
टीना अंबानी यांची खास पोस्ट
सौम्य, उदार आणि आशिर्वादाने परिपूर्ण.... ही माझ्यावर पडलेली पहिली छाप...33 वर्षे झाली तरी अजूनही तशीच आहे, असं म्हणतं टीना अंबानी यांनी सासू कोकिलाबेन अंबानी यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केला आहे. त्यांनी मोकळ्या हातांनी माझं स्वागत केलं आणि त्यांच्या मिठीची उब वर्षानुवर्षे अधिकच वाढली आहे. परंपरेत रुजलेली आणि अध्यात्मिक पण नवीन कल्पना आणि समकालीन मानसिकतेसाठी खुली असलेली, मम्मी ही कुटुंबाची ताकद आहे. आमच्या घरची महालक्ष्मी आहे. त्यांना असं शब्दात व्यक्त करणे किंवा त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करणे खरोखर अशक्य आहे. त्यांना जाणून घेणे हा एक अनुभव आहे. धन्यवाद, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी, माझी आई, खंबीर आधार आणि आमची मार्गदर्शक... वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अंबानी कुटुंबातील प्रमुख व्यक्ती
अंबानी कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर मोठा मुलगा मुकेश आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांची सर्वाधिक चर्चा होते. मात्र, आजही या कुटुंबात कोणाच्या मताला अधिक महत्त्व असेल तर ते नाव आहे कोकिला बेन म्हणजे कोकिला धीरुभाई अंबानी. मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या आई देखील आपल्या सुनांचे खूप लाड करतात. याच कारणामुळे जेव्हा जेव्हा ते एकत्र दिसतात तेव्हा त्यांचं अनोख रुप समोर येतं. यावेळी सुनांनी सासूबद्दल व्यक्त केल्या भावना.
जावा-जावांमध्ये खास नातं
टीना अंबानी आणि नीता अंबानी यांच्यातही चांगले संबंध आहेत. त्यांच्याबद्दल कितीही बोलले जात असले, तरी कोणत्याही फंक्शनचे फोटो सत्य दर्शवतात., दोघांमध्ये चांगले नाते असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कुटुंबाशी निगडित प्रसंग कोणताही असो, या सूना नेहमीच एकत्र दिसतात.
कोकिलाबेन अंबानी यांच प्रेम
एका मासिकासाठी टीना अंबानीच्या यांची मुलाखत होती. या मुलाखतीपूर्वी कोकिलाबेन यांनी शोभा डे यांच्यासोबत त्यांच्या सुना आणि कुटुंबाशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, 'माझ्या दोन्ही सुनांवर माझं खूप प्रेम आहे. त्या माझी खूप विचारपसून करतात आणि काळजी देखील घेतात. मी अनिलला रोज भेटते आणि मुकेश जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा मला फोन करतो. नीताची जिम खूप चांगली आहे, मी तिथे आठवड्यातून तीन वेळा मसाज करायला जाते. माझी मुलं माझी खूप काळजी घेतात आणि माझ्या नातवंडंही. माझी काही तक्रार नाही.
सासू-सुनेचं नातं होतं घट्ट
अंबानी कुटुंबात सासू-सुनेचं नातं अधिक घट्ट आहे. याला कारण आहे एकमेकांवर केलं जाणारं प्रेम आणि आदर. नातं घट्ट होण्यासाठी तुमचा एकमेकींवर सर्वाधिक विश्वास असणे गरजेचे आहे. एवढंच नव्हे तर कोकिलाबेन अंबानी यांनी सुरुवातीच्या काळात सुनांना दिलेलं प्रेम आणि वागणूक आज त्यांचं नातं घट्ट करायला कारणीभूत ठरत आहे. सासू-सुनांनी एकमेकांना दिलेला सन्मान सर्वात महत्त्वाचा ठरतो.