Newspaper Interesting Facts: आजकाल सगळं काही हे डिजिटल झालं आहे. जर आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर फोनमध्ये किंवा लॅपटॉपमधून आजकाल सगळी माहिती काढतात किंवा पुढच्या मिनिटाला तिथे माहिती मिळते. तर आजही अनेक लोक आहेत, जे या सगळ्यावर विश्वास न ठेवता वर्तमानपत्रावर विश्वास ठेवतात. आजही अनेकांची सकाळ ही चहा आणि त्यासोबत वर्तमानपत्र अशीच होते. वेळेनुसार वर्तमान पत्रात अनेक गोष्टी या बदलत असल्याचे आपण पाहतो पण काही बदलत नसेल तर ते आहे वर्तमानपत्राच्या तळाशी वेगवेगळ्या रंगाचे डॉट. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर वर्तमानपत्र वाचत असताना कधी ना कधी तुमचं लक्ष हे त्याच्या खालच्या बाजूला नक्कीच जातं. त्यातही हे चार वेगवेगळ्या रंगाचे डॉट तर नेहमीच आपलं लक्ष वेधतात. हे चार रंगाचे डॉट का बनवण्यात येतात आणि डॉट असले तरी त्यांचा रंग हा वेगळा का असतो? त्या मागचं कारण काय असेल याविषयी तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? तर तुम्हाला प्रत्येक पेजच्या खाली हे 4 वेगवेगळ्या रंगाचे डॉट्स पाहायला मिळतात. त्यामुळे इतक्या मोठ्या वर्तमानपत्राच्या तळाला हे 4 वेगवेगळ्या रंगाचे डॉट्स का असतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. 


खरंतर हे चार वेगवेगळ्या रंगाचे गोळे हे योग्य कलर पॅटर्न ठेवण्यासाठी मार्कर म्हणून काम करतात. लहानपणी आपण प्रायमरी कलर्सविषयी शिकलो होतो. तर आता तुम्ही विचार करत असाल की तीन रंग हे प्रायमरी आहेत. मग चार रंग का असतात वर्तमानपत्रावर तर त्याविषयी देखील जाणून घेऊया. 


लाल, पिवळा आणि निळा हे असे तीन प्रायमरी रंग आहेत. ज्यांना आपण एकमेकांसोबत मिक्स करुन बनवू शकत नाही. खरंतर या तिन्ही रंगाच्या मदतीनं आपण वेगवेगळे रंग नक्कीच बनवू शकतो. प्रायमरी कलर्सचा पॅटर्न हा प्रिंटरमध्ये देखील लगावण्यात येतो. यात फक्त एक काळ्या रंगाचा डॉट लावण्यात येतो. वर्तमानपत्रात असलेले हे रंगीत डॉट CMYK म्हणून ओळखले जातात. त्यात C चा अर्थ Cyan अर्थात निळा, M म्हणजे मजेंटा अर्थात गुलाबी. Y म्हणजे पिवळा आणि K चा अर्थ काळा असा आहे. 


हेही वाचा : Cooking Oil : स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या 'या' तेलामुळे तरुणांमध्ये वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका!


कोणत्याही वर्तमानपत्रात रंगीत चित्र आणि हेजलाइंस दर्शवण्यासाठी CMYK महत्त्वाच्या भूमिका साकारतात. प्रिंटिंगच्या वेळी या सगळ्या रंगाची प्लेट एका पेजवर वेगळ्या पद्धतीनं ठेवली जाते. जेव्हा वर्तमानपत्र हे भुरकट दिसतं, त्याचा अर्थ हा असतो की प्लेट्स ओव्हरपलॅप झाली आहे. जर एका रंगाचा डॉट हा दुसऱ्या रंगावर गेला तर त्यावर येणाऱ्या फोटोचा रंग हा खराब होऊ शकतो. हाच पॅटर्न पुस्तकांच्या बाबतीतही आणि मॅगझीनच्या बाबातीतही प्रिंट करताना दिसतो. सगळ्यात आधी ईगल प्रिटिंग कंपनीनं 1906 मध्ये या पॅटर्नचा वापर केला होता.