Cooking Oil : अनेक लोक त्यांच्या आरोग्याची हवी तितकी काळजी घेत नाहीत. अनेक लोक हे निरोगी आयुष्य जगण्यासाठी फास्टफूडकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना आहारातून बाहेरचा रस्ता दाखवतात. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की फक्त बाहेरचं किंवा फास्ट फूड न खाल्यानं तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकतात. तर तसं नसून आता तुमच्या घरातल्या जेवणातसुद्धा काही घटकांचा समावेश केल्यानं तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्याचंच एक उदाहरण आहे तुमच्या जेवणात तुम्ही कोणत्या प्रकारचं तेल वापरतात.
सूर्यफूल, कॅनोला, कॉर्न आणि द्राक्षाच्या बियाण्यांपासून तयार केलेल्या तेलांच्या अतिसेवनामुळे शरीरात जळजळ (इन्फ्लमेशन) होण्याचा धोका वाढतो. एका अभ्यासात कोलन कॅन्सर झालेल्या 80 रुग्णांच्या ट्यूमरमध्ये बायोएक्टिव्ह लिपिड्सचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. या लिपिड्स बियाण्यांच्या तेलात असलेले मॉलिक्युल्सचे विरघळतात किंवा तुटल्यामुळे तयार होतं. त्यामुळेच पचनसंस्थेत जळजळ वाढते आणि यामुळे ट्यूमरशी लढण्याची आपल्या शरीराची शक्ती किंवा क्षमता ही कमी होऊ लागते.
अल्ट्राप्रोसेस्ड फूडमध्ये बियाण्यांचे तेल, साखर, चरबी आणि रसायने मोठ्या प्रमाणावर असतात, ज्यामुळे पचन प्रक्रियेत जळजळ निर्माण होऊन आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. विशेषतः हृदयविकार, मधुमेह आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. संशोधनानुसार, अमेरिका आणि इतर देशांमध्ये बियाण्यांचे तेल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. सरासरी अमेरिकन नागरिक एका वर्षात सुमारे 100 पौंड बियाण्यांचे तेल वापरतो, जे 1950 च्या दशकाच्या तुलनेत खूपच जास्त आहे.
या अभ्यासात 30 ते 85 वयोगटातील लोकांना घेतलं होतं. त्यात आढळून आलं की 50 वर्षांखालील तरुणांमध्ये कोलन कॅन्सरची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. 90 टक्के प्रकरणांमध्ये रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातील कॅन्सरने ग्रस्त होते. यातील अर्ध्याहून अधिक रुग्णांना अॅडवांस टप्प्याचा कॅन्सर होता, जो उपचारासाठी खूप आव्हानात्मक आहे.
अमेरिकेतील काही आरोग्य संस्थांच्या मते, बियाण्यांचे तेल योग्य प्रमाणात वापरल्यास कर्करोगाचा धोका वाढतो, दरम्यान, असे ठोस पुरावे अजून मिळालेले नाहीत. मात्र, बियाण्यांच्या तेलाचा अतिरेक टाळणे, आहारात नैसर्गिक आणि अँटी-इन्फ्लेमेटरी पदार्थांचा समावेश करणे, हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की जीवनशैलीत योग्य बदल आणि आहारात संतुलन राखल्यास कोलन कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)