Vivah Muhurta 2023 : नोव्हेंबर, डिसेंबरचे शुभ मुहूर्त... या दिवशी करु शकता `शुभमंगल सावधान` आणि `गृहप्रवेश`
Marriage Muhurta : दिवाळीमध्ये तुळशीचं लग्न झालं की, लग्नांची लगबग सुरु होते. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अनेक शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या.
Vivah Muhurta 2023 : हिंदू धर्मात प्रत्येक कार्याकरिता शुभ मुहूर्त पाहिला जातो. शुभ काळ आणि शुभ मुहूर्त यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. चातुर्मासात 29 जून ते 22 डिसेंबरपर्यंत विवाह, साखरपुडे, गृहप्रवेश आणि अनेक शुभ विधी करण्यासाठी मुहूर्त जाहिर करण्यात आले आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये गृहप्रवेशाकरिता 10 शुभ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये 6 आणि डिसेंबरमध्ये 4 असे एकूण 10 शुभ मुहूर्त आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबरमधील विवाह मुहूर्त
2023 वर्ष संपता संपता दोन महिन्यात शुभ विवाहाचे मुहूर्त आहेत. या दिवसांमध्ये अनेक मंगल कार्य करु शकतात. शुभ मुहूर्त, जन्म वेळ ही नक्षत्र आणि चंद्रमा यांच्यावर अवलंबून असतात. नोव्हेंबरमध्ये चातुर्मास संपत असून या दिवसापासून लग्नाचे शुभ मुहूर्त सुरु होत आहेत. यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नाचे 5 शुभ मुहूर्त आणि डिसेंबरमध्ये विवाहाचे 5 शुभ मुहूर्त आहेत.
नोव्हेंबर 2023 मध्ये विवाहाचे शुभ मुहूर्त
23 नोव्हेंबप गुरुवारी शुभ विवाह मुहूर्त 9 वाजून 01 मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06 वाजून 50 मिनिटांपर्यंत आहे.
24 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी शुभ विवाह मुहूर्त सकाळी 6 वाजून 51 मिनिटे ते 9 वाजून 06 मिनिटे आहेत.
27 नोव्हेंबर रोजी सोमवारी शुभ विवाह मुहूर्त दुपारी 01 वाजून 35 मिनिटे ते दुसऱ्या दिवशी 06 वाजून 54 मिनिटांपर्यंत आहे
28 नोव्हेंबर रोजी मंगळवारी शुभ विवाह मुहूर्त 06 वाजून 54 मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06 वाजून 54 मिनिटांपर्यंत आहे.
29 नोव्हेंबर रोजी बुधवारी शुभ विवाह मुहूर्त सकाळी 6 वाजून 54 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजेपासून 59 मिनिटांपर्यंत आहे.
डिसेंबर 2023 शुभ मुहूर्त
6 डिसेंबर बुधवारी सकाळी 7 वाजून ते दुसऱ्या दिवशी 7 वाजून 01पर्यंत आहे
7 डिसेंबर गुरुवारी शुभ विवाह मुहूर्त 7 वाजून 01 ते संध्याकाळी 4 वाजून 09 पर्यंत ते सकाळी 05 ते 07 पर्यंत हा मुहूर्त आहे.
8 डिसेंबर शुक्रवारी शुभ विवाह मुहूर्त सकाळी 7 वाजून 01 मिनिटे ते सकाळी 08 वाजून 54 मिनिटांपर्यंत
9 डिसेंबर रोजी शुक्रवारी शुभ विवाह मुहूर्त सकाळी 10 वाजून 43 मिनिटे ते रात्री 11 वाजून 37 मिनिटांपर्यंत आहे
15 डिसेंबर रोजी शुक्रवारी शुभ विवाह सकाळी 8 वाजून 10 मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 24 मिनिटांपर्यंत आहे
नोव्हेंबर महिन्यातील गृहप्रवेशाचे मुहूर्त
या वर्षी 10 गृहप्रवेशाचे मुहूर्त
17 डिसेंबर शुक्रवार
18 डिसेंबर शनिवार
22 नोव्हेंबर बुधवार
23 नोव्हेंबर गुरुवार
27 नोव्हेंबर सोमवार
29 नोव्हेंबर बुधवार
डिसेंबर 2023 मध्ये गृहप्रवेश
6 डिसेंबर बुधवार
8 डिसेंबर शुक्रवार
15 डिसेंबर शुक्रवार
21 डिसेंबर गुरुवार