Saree Wearing Scientific Reason in Marathi : भारतीय संस्कृतीत साडीला अतिशय महत्त्व आहे. आपण लहानपणापासून आपली आई, आजी, मावशी, काकी यांना साडी नेसल्याच पाहिलं आहे. त्या काळातील महिला या साडीवर अख्या घरातील काम करायची अगदी कितीही कुठलाही प्रवास असो साडी नेसल्यामुळे त्यांना काही कठीण जायचा नाही. अगदी रात्री झोपतानाही त्या साडी नेसूनच झोपायच्या. मात्र काळ बदलला आता साडी नेसणं म्हणजे एक फॅशन झाली आहे. आज आपण अनेक महिलांना फक्त लग्न सोहळा, समारंभ किंवा धर्मिक कार्य या प्रसंगाना नेसताना पाहतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण अनेक महिला अशा आहेत ज्यांच्याकडून आपण ऐकतो मला साडी नेसून आवरता येत नाही, चालता येत नाही किंवा काम करताना अडचण येते. पण साडी हे नसूत वस्त्र नसून त्यामागे अनेक वैज्ञानिक कारणं दडली आहेत. या कारणाबद्दल तुम्हाला समजल्यास तुम्ही देखील नक्की साडी नेसण्याचा विचार कराल. (Wearing sarees is not a fashion but there are scientific reasons behind it every woman should know this)


भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेली साडी जेव्हा महिला परिधान करते तेव्हा ती सुंदर, आकर्षित आणि आदरणीय वाटते. वैज्ञानिकदृष्टीकोनातूनही साडी नेसण्यामागे महत्त्वाच कारण आहे. ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये साडी नेसण्यामागील वैज्ञानिक कारण समजून सांगितल आहे. 


...म्हणून साडी नेसली पाहिजे !


जया मदन हिने साडी नेसण्यामागील कारणं सांगितली आहेत. ती म्हणते की, आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला ऊर्जेचा प्रवाह असतो. या प्रवाहापासून शरीरावरील कपडे आपलं संरक्षण करतात. आपल्या आजूबाजूला सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो. या ऊर्जापासून बचाव होण्यासाठी कपडे आपल्यासाठी कवचच काम करतो. आता एनर्जी ही आपल्या आवतीभवती वतुर्ळाकारात फिरत असते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा गोल नेसलेल्या साडी आणि साडीच्या लेटमध्ये अडकते आणि आपलं नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होतं. त्यामुळे पूर्वीच्या काळात पुरुष हे लुंगी, धोती परिधान करायचे. 


शरीरातील या भागातून मिळते सकारात्मक एनर्जी!


जया पुढे म्हणतात की, आपल्या पोटाचा भाग हा साडी नेसल्यामुळे उघडा राहतो. ज्या प्रकारे घरातील ब्रह्मस्थान हे मुक्त ठेवतात. कारण सूर्यकडून मिळाली ऊर्जा आणि प्रकाश आपण जास्त जास्त घेता येते.



त्यानुसार शरीरातील ब्रह्मस्थान हे पोटाचा भाग असतो तो मोकळा सोडला जातो. तुम्हाला माहिती आहे का? सूर्य प्रकाशापासून मिळणारे व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीराला पोट आणि मांडीच्या भागातून मिळतं. त्यामुळे साडीमुळे शरीरातील ब्रह्मस्थान ओपन राहल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराला मिळते आणि ती शरीरातील इतर भागात पसरते. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)