Nomophobia: नोमोफोबिया म्हणजे नेमकं काय? व्यक्तीला `या` गोष्टीची वाटू लागते भीती
Nomophobia: मोबाईल फोनचा जास्त वापर करणे हा देखील एक आजार मानला जातो. आज आम्ही तुम्हाला नोबोफोबियाबद्दल सांगणार आहोत.
Nomophobia: प्रत्येक व्यक्तीला एखाद्या गोष्टीची भीती वाटतेच. एखाद्या वस्तू, परिस्थिती, कार्यक्रम, भावना किंवा प्राण्याबद्दल वाटणारी तीव्र भीती म्हणजे फोबिया. कदाचित तुम्हालाही कशाची तरी भीती वाटत असेल. आजकाल आपल्या सर्वांकडे फोन असतोच. आज क्वचितच असा कोणी असेल जो मोबाईल वापरत नसेल. मोबाईल फोन आणि इंटरनेट ही मानवाकडून सर्वाधिक वापरली जाणारी एक गोष्ट आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, मोबाईलचा अतिवापर केल्याने तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.
मोबाईल फोनचा जास्त वापर करणे हा देखील एक आजार मानला जातो. आज आम्ही तुम्हाला नोबोफोबियाबद्दल सांगणार आहोत. हा नोमोफोबिया मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे होतो.
काय आहे नोमोफोबिया?
आजकाल प्रत्येकजण मोबाईल फोन आणि इंटरनेट वापर करतो. पण आपल्यापैकी काही लोक वारंवार फोनवर असून सतत मोबाईलमध्ये व्यस्त असतात. इतकंच नाही तर नेटवर्क आणि इंटरनेटच्या कमतरतेमुळे अनेक वेळा काही लोकांना अस्वस्थ वाटू लागतं. या अस्वस्थतेला आणि तणावाला नोमोफोबिया म्हणतात. सोप्या भाषेत नो-मोबाइल-फोबिया म्हणजे मोबाईल नसण्याची भीती.
तज्ञांच्या मताप्रमाणे, नोमोफोबिया ही एक मानसिक स्थिती आहे. ज्यावेळी एखादा व्यक्ती या फोबियाने ग्रस्त असतो तेव्हा लोकं त्यांच्या स्मार्टफोन किंवा डिजिटल गॅझेटपासून दूर असतात, किंवा कमी बॅटरी किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीची कमतरता असतात. यावेळी त्या संबंधित व्यक्तीला चिंता, अस्वस्थता आणि भीती वाटू लागते.
काय आहेत नोमोफोबियाचं लक्षणं?
नोबोफोबियाचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे नेटवर्क नसलेल्या भागात जाण्याची भीती. नोबोफोबियाने ग्रस्त असलेले लोक ज्या ठिकाणी नेटवर्क नाही अशा ठिकाणी जाण्यास घाबरतात. याशिवाय फोन जवळ असताना बॅटरी संपून जाण्याची त्यांना सतत चिंता लागलेली असते. याशिवाय नेटवर्क नसणं, फोन वारंवार तपासणं, फोनला स्वत:पासून दूर ठेवण्यात अडचण येणं आणि इंटरनेट कनेक्शन नसताना चिंताग्रस्त होणं ही देखील नोबोफोबियाची लक्षणे आहेत.
यापासून स्वतःला कसं दूर ठेवावं?
नोबोफोबियापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी शिस्तबद्ध असणं सर्वात महत्वाचं आहे. यासाठी तुम्हाला मोबाईल फोनचा मर्यादित काळासाठी वापर करावा लागतो. मोबाईल फोन स्वतःपासून दूर ठेवून इतर कामात व्यस्त राहावं. फोनमध्ये फक्त अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचं नोटीफिकेशन सुरु ठेवावं. बाकीच्या सूचना म्यूट कराव्यात. असं केल्याने तुम्ही तुमचा मोबाईल वारंवार तपासण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवू शकाल. मोबाईल फोन व्यतिरिक्त, एखाद्याने कुटुंबातील सदस्य आणि मित्रांशी शारीरिक संभाषण देखील गरजेचं आहे. त्यामुळे सतत मोबाईलचा वापर टाळता येतो.