Onion In Socks Health Benefits : आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोश्टी आहेत ज्या अनेक प्रकाराच्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात. त्यातील एक म्हणजे कांदा...कांदा हा रोजच्या जेवण्यातील अविभाज अंग असतो. कांदा हा जेवणाची चव वाढण्यापासून त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. कांद्याच्या सेवनाने अनेक आजार बरे होतात. त्याशिवाय कांद्याच्या रसाने केस गळणे देखील कमी होते, असं तज्ज्ञ सांगतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्हाला माहित आहे का की सॉक्समध्ये कांदा घालून झोपणे देखील तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. होय, एका नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, रात्री झोपण्यापूर्वी कांदा सॉक्समध्ये ठेवल्याने त्यातील पोषक घटक त्वचेमध्ये शोषले जातात त्यातून तुम्हाला अनेक फायदे होतात. होय, कांद्यामध्ये असलेले फॉस्फोरिक अ‍ॅसिड रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात आणि ते रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. 


पायाच्या तळव्यामध्ये अशा अनेक पेशी असतात, ज्या वेगवेगळ्या पेशींना संपूर्ण शरीराशी जोडलेल्या असतात. चिनी औषधांमध्ये याला मेरिडियन म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच शरीराचा एक भाग ज्याद्वारे प्रत्येक अवयवाकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कांद्याचे तुकडे सॉक्समध्ये ठेवल्यास ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं. मात्र सॉक्समध्ये काप अशा प्रकारे ठेवा की ते पूर्णपणे पायाला स्पर्श करतील, अन्यथा तुम्हाला कोणताही फायदा या उपायातून मिळणार नाही. 


वैज्ञानिक आधार आहे काय?


पायाच्या बिंदूंचा संपूर्ण शरीराशी संबंध असून पायांच्या नसा शरीराच्या विविध भागांशी जोडलेल्या असतात. हे शरीरात इलेक्ट्रिकल सर्किटसारखे काम करतात. मात्र त्यांना सतत शूजमध्ये बंद ठेवल्याने तुम्हा काही नुकसान होतात. त्यामुळे डॉक्टरही कधी कधी अनवाणी चालण्याचा सल्ला आपल्या रुग्णाला देतात. कांदे हे हवा शुद्ध करण्यासाठी ओळखले जातात आणि जेव्हा त्वचेवर लावले जातात तेव्हा ते बॅक्टेरिया मारण्यास मदत करतात. पण लक्षात ठेवा कांदा एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरू नका कारण त्यात बॅक्टेरिया जमा होतात. रक्त स्वच्छ करण्यासाठी आणि बॅक्टेरिया मारण्यासाठी वापरणे खूप सोपं आहे. असा करा कांदाचा वापर.


कांदा वापरण्याचे मार्ग


कांद्याचे तुकडे करा, सॉक्समध्ये ठेवा आणि झोपायला जा. मात्र हे लक्षात ठेवा की केवळ सेंद्रिय कांदे वापरा कारण ते कीटकनाशके आणि इतर रसायनांपासून मुक्त असतात. रात्री तुमच्या रक्तात प्रवेश करतात. आणखी एक गोष्ट, कांद्याचे सपाट तुकडे करा जेणेकरून तुम्ही ते तुमच्या पायाखाली सहज लावू शकाल आणि झोपेच्या वेळी कांद्याचा तुमच्या पायावर सहज परिणाम करतात. 


बॅक्टेरिया दूर राहतील


कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. कारण दिवसभर चालत राहिल्यामुळे आणि माती किंवा घामाच्या संपर्कात आल्याने पायांना भरपूर बॅक्टेरिया चिकटून राहतात, ज्यामुळे आपण साफसफाईकडे लक्ष देत नाही. पायाचे तळवे हे आपल्या शरीराचे केंद्रबिंदू असतात, म्हणूनच कांद्याचा रस तळांवर चोळल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात.


रक्त शुद्ध करतात


खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारची अशुद्धता विरघळते, त्यामुळे आपण आजारी पडतो. कांद्यामध्ये फॉस्फोरिक ऍसिड असते. हे ऍसिड त्वचेद्वारे शोषले जाते तेव्हा रक्त शुद्ध करण्यास मदत करते.


हवा शुद्ध होते


आजकाल घराच्या बाहेरची आणि आतली हवाही शुद्ध नसते. पण जेव्हा तुम्ही तुमच्या सॉक्समध्ये कांदा घालून झोपता तेव्हा कांद्याचा हा उग्र वासाचा तुकडा खोलीतील हवा शुद्ध करण्यास मदत करेल. आणि यामुळे पायांची दुर्गंधी दूर होईल आणि रसायने आणि विषारी पदार्थ काढून टाकतील. इंग्लंडमध्येही, प्लेगच्या काळात, हवा शुद्ध करण्यासाठी कांदे कापून खोलीत सोडले जातात.


पायाच्या दुर्गंधीपासून मुक्तता होते


जर तुमच्या पायाला दुर्गंधी येत असेल तर कांद्याचे भरपूर तुकडे करा आणि ते मोजे घालून घाला. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)