Love or Attraction : आकर्षणाला प्रेम तर समजत नाही ना? काय आहे या दोन शब्दांमध्ये अंतर?
Difference Between Love And Attraction : प्रेम की आकर्षण हे दोन शब्द आपण अनेकदा ऐकतो? पण या दोघांमधील अंतर काय?
'लव ऍट फर्स्ट साइट' मध्ये अनेकजण विश्वास ठेवतात. पण खरंच प्रेम असं एका नजरेत होतं का? समोरच्या व्यक्तीबद्दल खरंच प्रेम वाटतंय की आकर्षण हा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. (Know Difference Between Love Attraction) कारण प्रेम आणि आकर्षण यामध्ये खूप अंतर असतं. अशामध्ये जर तुम्ही आकर्षणाला प्रेम समजू लागलात तर नात्यामध्ये नंतर समस्या निर्माण होऊ शकतात? (Difference Between Love Attraction)
आकर्षण म्हणजे काय?
अनेकदा एका व्यक्तीला पाहिल्यानंतर एका नजरेत प्रेम होतं. खरं म्हणजे ते आकर्षण असते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता तेव्हा सगळं छान होतं. यामुळे जीवनात एक आनंद असतो. पण तुम्ही त्या व्यक्तीला योग्य पद्धतीने ओळखत नसाल तर त्याला प्रेम म्हणू शकत नाही. ही भावना कायमच एकतर्फी असते.
आकर्षणाची लक्षणे
आकर्षण हे प्रेमापेक्षा जास्त छपाट्याने वाढतं? या वेळी इतर कोणत्याच गोष्टी करु इच्छित नाही. फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचा विचार डोक्यात असतो. पण आकर्षणाशी संबंधित असलेला आनंद काही क्षणातच संपतो. आणि तो विषय दुःखाचं एक कारण होतं. या भावना कधी कधी तुम्हाला धोका देऊ शकतात.
प्रेम म्हणजे काय?
प्रेम फक्त जोडीदाराशी होतोच असं नाही? आई-वडिल, बहिण-भाऊ, मित्र यांच्यावरही तुमचं प्रेम असतं. प्रेमात कधी लोभ, आकर्षण नसते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटलात तर त्या व्यक्तीच्या स्वभावाच्या देखील प्रेमात तुम्ही पडू शकता. अशावेळी निस्वार्थीपणे असलेली भावना म्हणजे देखील प्रेम आहे. जीवनातील अनेक क्षण समोरच्या व्यक्तीसोबत घालवण्याचा विचार करणे म्हणजे प्रेम आहे.
प्रेम आणि आकर्षणातील अंतर
प्रेम आणि आकर्षण याच्यात खूप अंतर आहे. पाहताच क्षणी होते ते प्रेम नाही तर आकर्षण आहे. आकर्षण लगेच वाटतं पण कमी काळ टिकते तर प्रेम हळू हळू बहरते पण ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहते. प्रेम आणि आकर्षणातील अंतर समजून घेण गरजेचं आहे. कारण अनेकदा आपण नात्यामध्ये यातील फरक समजून घेत नाही आणि मग आपल्या पदरी निराशा पडते. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.