काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिषेक बच्चनने सोशल मीडियाशी संबंधित पोस्ट लाइक केली आहे. यानंतर ग्रे डिवोर्स चर्चेचा विषय ठरला. यानंतर ग्रे डिवोर्स म्हणजे काय? याबद्दल सोशल मीडियावर ट्रेंड देखील सुरु झाला. मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यातील नातं आलबेल नसल्याच सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबांनी यांच्या शाही सोहळ्यात ऐश्वर्या राय आपली मुलगी आराध्यासोबत दिसला. तर दुसरीकडे बच्चन कुटुंबिय सगळे उपस्थित होते. असं असताना चर्चांना उधाण आलं. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात परिस्थिती चांगली नसल्याचं अधोरेखित झालं आहे. 


काय आहे ग्रे डिवोर्स 


लग्न झालेल्या दाम्पत्यामध्ये चांगल काही चालू नसेल अशावेळी घटस्फोट घेऊन मोकळं व्हावं. कारण वाद करत भांडण करत एकत्र राहण्यामध्ये काहीच अर्थ नाही. याचा परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर याचा परिणाम होतो. लग्नाच्या 5 ते 10 वर्षांनंतर लोकं कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे घटस्फोट घेतात. हल्ली वयस्कर किंवा लग्न होऊन बरीच वर्षे झालेली लोकं देखील घटस्फोट घेतात. 


जेव्हा दोन व्यक्ती जवळजवळ बरीच वर्षे एकत्र घालवतात आणि नंतर त्यांचा घटस्फोट होतो, त्याला ग्रे घटस्फोट म्हणतात. ग्रे घटस्फोट हा वृद्धापकाळात वाढणाऱ्या राखाडी केसांपासून आलेला हा शब्द आहे. या नात्यामध्ये कपल अनेक वर्ष एकत्र राहून मुलांच संगोपन केलं. एवढंच नव्हे तर अनेक समस्यांना एकत्र सामोरे गेले. एवढंच नव्हे तर जीवनाचा अनेक काळ एकत्र घालवले. असे नाते संपवणे कठीण होऊन जाते. 


ग्रे घटस्फोटाची कारणे काय 


आर्थिक गोष्ट


ग्रे डिवोर्समध्ये आर्थिक बाबी हे प्रमुख कारण असते. एका पती-पत्नीमध्ये आर्थिक संपत्तीवरुन वाद होतो तेव्हा यामुळे तणाव निर्माण होतो. अनेकदा पैशांवरुन मतभेद निर्माण होतात. अशावेळी नातं पुढे घेऊन जाणं कठीण होतं. ही समस्या तेव्हा निर्माण होते तेव्हा जोडीदारामध्ये मतभेद निर्माण होतात. 


दूर जाणे 


ग्रे डिवोर्सचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे एकमेकांपासून दूर जाणे. पालक मुलं मोठी होईपर्यंत वाट पाहतात. पण एकदा मुलं मोठी झाली की, असे दाम्पत्य एकमेकांपासून घटस्फोट घेतात. 
 
धोका 


ग्रे डिवोर्समध्ये धोका देखील महत्त्वाचं कारण ठरते. अनेकदा नात्यामध्ये एखादा जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला धोका देतो. अशावेळी मुलं मोठी होण्याचीही वाट न बघता हे कपल वेगळे होतात.