काय आहे Office Peacocking? कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यासाठी नवा फंडा
कोणतीही गोष्ट पटवून द्यायची असेल तर त्याचा ट्रेंड निर्माण होणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये आणण्यासाठी Office Peacocking नवा फॉर्म्युला.
कोविडनंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. यामध्ये कामाची पद्धतही बदलली आहे. कोविड दरम्यान, कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम देण्याची सक्ती करण्यात आली. अशा परिस्थितीत आता कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलावण्याचा प्रयत्न करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी ते विविध युक्त्या वापरत आहेत. यापैकी एक म्हणजे ‘ऑफिस पीकिंग’. आजच्या काळात 'ऑफिस पीकिंग'चा ट्रेंड चर्चेचा विषय आहे.
ऑफिस पीकॉकिंग म्हणजे काय?
कोविड नंतर, आता प्रत्येकाचे आयुष्य पुन्हा रुळावर आले आहे. लोक आपले सामान्य जीवन जगू लागले आहेत.अशा परिस्थितीत घरून काम करण्याची सवलत जवळपास अनेक कंपन्यांमध्ये संपली आहे. अशा परिस्थितीत आता कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यासाठी विविध आकर्षक पद्धती अवलंबत आहेत. यापैकी एक म्हणजे ऑफिस पीकॉकिंग. आपल्या कर्मचाऱ्यांना स्टायलिश ऑफिस, ट्रेंडी फर्निचर, चांगली पेंट्री आणि विविध सुविधा पुरवणे याला ऑफिस पीकॉकिंग म्हणतात.
कोरोना काळ आणि ऑफिस पीकॉकिंग
कोविड-१९ च्या जागतिक महामारीनंतर कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी परत आणण्यासाठी त्याचा ऑफिस पीकॉकिंगची मदत घेतली जात आहे. मानव संसाधन सेवा प्रदाता 'टीमलीज सर्व्हिसेस'चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक नारायण म्हणाले की, जागतिक महामारीनंतर भारतात 'ऑफिस पीकिंग' संकल्पना पसंतीला पडत आहे.
Office peacocking चे फायदे
फिजकली उपस्थित असणे: अशा वातावरणामुळे, कर्मचाऱ्यांना असे वाटणार नाही की त्यांना केवळ प्रोडक्टिविटी दाखवायची आहे. स्वतः ऑफिसमध्ये उपस्थित राहणे देखील तितकेच महत्त्वाचे असेल.
मनोबल वाढवा: चांगले वातावरण मनोबल वाढवते आणि काम अधिक आनंददायक बनवते. अशा वातावरणात काम करणे कर्मचाऱ्यांना नक्कीच आवडेल.
आकर्षक कल्पना - Office Peacocking मध्ये कर्मचाऱ्यांना बोलावण्यासाठी वेगवेगळ्या आकर्षित कल्पनांचा वापर केला जातो.
कंपनीसाठी किती फायदेशीर
Office Peacocking ही गोष्ट कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये आकर्षित करणारी असली तरीही कंपनीवर याचा जास्त बोझा पढू शकतो. कंपनीवर ऑफिस अधिक आकर्षिक करण्यासाठी आर्थिक ताण पडू शकतो.