तुम्हालाही छातीवर भूत बसल्यासारंख वाटतंय का? काय आहे हा प्रकार?
What Is Sleep Paralysis: कधी कधी झोपेतून उठल्यानंतर आपल्या जाणवतं की आपल्या कुणी तरी पकडले होते. आपण अशा परिस्थिती घाबरतो. पण या मागच कारण तुम्हाला माहितीय का?
What Is Sleep Paralysis news in Marathi: अनेकदा अचानक भिती जाणवते. किंवा रात्री झोपेत अचानक जाग येते, किंवा तुम्हाला खूप उशिरापर्यंत झोप येत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. कधी तरी आपण गाढ झोपेत असतो आणि अचानक आपल्या छातीवर कोणीतरी बसल्यासारख वाटत. अशावेळी जाग आल्यानंतर आपण पूर्णपणे घाबरलेलू असतो. काही लोकाचं असं म्हणं आहे की, झोपेत छातीवर भूत बसले होते. त्यामुळे काहीच हालचाल करायला जमत नव्हते.असं अनेकांना वाटतं. जर तुम्हालाही असं काही वाटत असेल तर नक्कीच तुम्ही स्लीप पॅरालिसिसची शिकार झालेला आहात. नक्की हा आजार काय आहे ते जाणून घेऊया...
स्लीप पॅरालिसिस गोंधळ आणि चिंता एकत्र परिणाम करतात तेव्हाच परिस्थिती अधिक धोकादायक बनते, असे तज्ज्ञांचे मत आहे. स्लीप पॅरालिसिस हे सहसा तरुणांमध्ये दिसून येते. हीच समस्या 25 ते 44 वर्षे वयोगटातील स्त्री-पुरुषांमध्ये दिसून येते. जगभरातील लोकसंख्येपैकी सुमारे 6% लोक या आजाराने ग्रस्त आहेत.
स्लीप पॅरालिसिस म्हणजे काय?
स्लीप पॅरालिसिस ही अशी स्थिती आहे जेव्हा एखादी व्यक्ती झोपेत मेंदू जागृत राहतो, परंतु शरीर झोपलेले असते. अशा वेळी, जेव्हा तुम्ही हलण्याचा किंवा उठण्याचा प्रयत्न करता तेव्हा असे वाटते की कोणीतरी तुम्हाला असे करण्यापासून रोखत आहे. किंवा छातीवर भूत येऊन बसले आहे. यावर तज्ज्ञांनी सांगितले की, स्लीप पॅरालिसिसमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती जागृत होते तेव्हा तो आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवू शकत नाही. यामुळे तो त्याच्या शरीराचा कोणताही अवयव हलवता येत नाही.
स्लीप पॅरालिसिस कोणाला होतो?
हे नेहमी निद्रानाशाचा त्रास असलेल्या लोकांसोबत जास्त होते. रात्री उठणे आणि झोपणे या दरम्यान जी स्थिती उद्भवते त्याला स्लीप पॅरालिसिस म्हणतात. तेव्हा शरीर मेंदूच्या आज्ञा स्वीकारत नाही आणि जड होऊन जाते.
स्लीप पॅरालिसिसची लक्षणे काय आहेत?
- बोलू शकत नाही आणि शरीर हालचाल करू शकत नाही.
- नकारात्मक ऊर्जा जाणवेल.
- घरात कोणीतरी असल्यासारखे भास होईल.
- एखाद्या व्यक्तीची सावली डोळ्यांसमोर आल्यासारखे वाटते.
स्लीप पॅरालिसिसपासून बचाव
- स्लीप पॅरालिसिस पूर्णपणे रोखणे काहीसे कठीण आहे. परंतु पुरेशी झोप घ्या. (7-8 तास)
- तणाव कमी करा.
- नियमित व्यायाम करा.
- झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा.
- संतुलित आहार घ्या
- रोज झोपण्यापूर्वी योगा करा
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)