Best Time To Drink Green Tea : अनेकजण दररोजच्या आहारात ग्रीन टीचे सेवन करू लागले आहेत. आरोग्याविषयी सजक असणारे लोक अधिकतर दुधाच्या चहा ऐवजी ग्रीन टी चे सेवन करण्यास प्राधान्य देतात. ग्रीन टी च्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. परंतु ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ माहित नसेल तर त्याचे साइड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात. तेव्हा ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती याविषयी जाणून घेऊयात. 


ग्रीन टी पिण्याचे फायदे : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. पोटावरची चरबी कमी होते 
2. त्वचा चमकदार होते
3. पचनक्रिया सुधारते 
4. वजन कमी करण्यासाठी मदत होते 
5. डायबेरीज रुग्णांसाठी फायदेशीर 
6. मेटाबॉलिज्म वाढते 
7. रोगप्रतिकारक शक्ती वाढते 


हेही वाचा : भाजीत चुकून तेल जास्त पडलंय? टेन्शन नाही... 'या' सोप्या ट्रिक्स वापरून काढा जास्तीचं तेल


सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी चे सेवन करावे का? 


सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी चे सेवन केल्याने पोटदुखी होऊ शकते. ग्रीन टी मध्ये आढळणारे पॉलीफेनॉल टॅनिन पोटातील आम्ल वाढवतात पोटातील आम्ल वाढवते. परिणामी पोटदुखी, जळजळ आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात. नेहमी नाश्त्यानंतर ग्रीन टी चे सेवन करावे. नाश्ता, जेवण केल्यावर ग्रीन टी पिणे योग्य आहे मात्र रिकाम्यापोटी याचे सेवन करू नये. तसेच ग्रीन टी चे अधिक सेवन केल्यास उलट्या, गॅस आणि चक्कर अशा समस्या निर्माण होऊ शकतात. 


ग्रीन टी रात्री पिऊ शकतो का? 


रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टीचे सेवन करू नये. रात्री ग्रीनचे सेवन केल्यावर लिव्हरशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. रात्री ग्रीन टी चे सेवन केल्यास झोपेची समस्या उद्भवू शकते. 


ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत : 


सकाळ आणि संध्याकाळी ग्रीन टी प्यायल्याने पचनक्रिया गतिमान होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र दिवसभरात तीन ते चार कपांपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नये. तसेच दूध आणि साखर मिसळून ग्रीन टी पिणे टाळावे. ग्रीन टी प्यायल्यावर काहीवेळ काहीही खाऊ नका.