रेस्तराँ आणि हॉटेल यांतील फरक काय? हॉटेलचा मराठी अर्थ वाचून आश्चर्यचकित व्हाल!
Intetesring Facts : तुम्ही कधी हॉटेलमध्ये गेला आहात का? तुम्ही रेस्तराँमध्ये गेला आहात का? या दोन्ही एकसारख्याच गोष्टी आहेत असंच तुम्हालाही वाटतंय ना? जाणून घ्या काही रंजक गोष्टी.
Intetesring Facts : आपण बऱ्याचदा एखाद्या खाण्याच्या ठिकाणी गेलो, जिथं बसण्याची व्यवस्था आहे. जिथं तुम्हाचा चवीष्ट पदार्थांची मेजवानी खायला मिळते वगैरे वगैरे. की आपण, 'अरे मी अमुक अमुक हॉटेलमध्ये आलेय/ आलोय' असं म्हणतो. गंमत म्हणजे तुम्ही ज्याचा उल्लेख हॉटेल म्हणून करताय ते मुळात हॉटेल आहे की रेस्तराँ हेच तुम्हाला ठाऊक नसतं. अनेकदा बाहेर पाटीवर रेस्तराँ लिहिलेल्या जागेलासुद्धा आपण सरसकट हॉटेल म्हणून मोकळे होते. आता इथून पुढं तसं क्वचितच होईल. कारण, इथं आपण जाणून घेणार आहोत रेस्तराँ आणि हॉटेल यांच्यातील फरक. (diffrence between restaurant and hotel )
मुळात 'रेस्तराँ' या शब्दाचा जन्म 'रस्तोरातीव' या शब्दातून झाला. शब्दश: याचा अर्थ होतो पुनर्संचयित करणारा. आपल्या संस्कृतीत अन्न आणि आरोग्याचा संबंध सांगण्यात आला असून, इथं रेस्तराँचा संदर्भ आरोग्यास पूरक असाही होतो. या शब्दाची पाळंमुळं फ्रान्मधून येतात. जिथंही अनेक वर्ग पाहायला मिळाले. ज्यामध्ये केटरर, हॉटेलियर यांचाही समावेश होता. त्यावेळी हॉटेल ही एक अशी संकल्पना होती जिथं तुम्हाला राहण्याची आणि खाण्याची सुविधा देण्यात येते. अनेकदा तिथं खाण्यासाठीचे पर्याय उपलब्यध असतीलच असं नव्हतं. त्यावेळी बेकर्स, चीझ तयार करणारे आणि विकणारे यांचे स्वतंत्र व्यवसाय होते. पुढे अमेरिका, युरोप आणि त्यामागोमाग भारतातही हे प्रस्थ सुरु झालं.
हेसुद्धा पाहा : पालकांनो मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना 'हे' प्रश्न नक्की विचारा
प्राधान्यानं महाराष्ट्र आणि मुंबईविषयी सांगायचं झाल्यास तिथं भोजनगृह किंवा भोजनालय अशा आशयानं या ठिकाणांना संबोधलं गेलं. हॉटेल्सना शुद्ध मराठी भाषेत 'भोजन वसतीगृह' असं म्हणायचे. 1830 मध्ये भारतात पहिलं हॉटेल कलकत्त्यात सुरु झालं. तर, पहिलं भोजनगृह 1881 मध्ये पुण्यात सुरु झालं. त्याआधीची रेस्तराँ अस्तित्वात होती पण, ती भारतीयांनी सुरु केलेली नव्हती. तर, तेव्हा भारतीयांचा कल खालावळींकडे होता.
रेस्तराँ आणि हॉटेलमधील फरक लक्षात आला?
राहिला मुद्दा रेत्सराँ आणि हॉटेलच्या फरकातील तर, रेस्तराँ ही खाण्यापिण्याची एक अशी जागा होती जिथं तुम्ही ठराविक वेळापलीकडे थांबू शकत नव्हता. शहरात किंवा एखाद्या महामार्गावर हे रेस्तराँ असतात. तर, हॉटेल म्हणजे एक असं ठिकाण जी सहसा एक मोठी इमारत असते. जिथं वाहनतळापासून खाण्यापिण्याची आणि मुक्कामाचीही व्यवस्था असते. हॉटेलच्या खोलीमध्ये बऱ्याचदा टीव्ही, फ्रीज, टेलिफोन अशा सुविधाही पुरवण्यात येतात.
कमाल वाटतेय ना? इतकी वर्षे तुम्ही हॉटेलला रेस्तराँ, रेस्तराँला हॉटेल किंवा काही भलतंच म्हणत आला आहात. इथून पुढे मात्र अशी चूक करू नका. इतरांनाही समजवून सांगा हा मजेशीर फरक.