सध्याची जीवनशैली अशी आहे की, प्रत्येकाच्या घरात औषधांचा एक साठाच जमा झालेला असतो. अनेकदा ही औषधं, गोळ्या अर्ध्यात सोडल्या जातात. हे उरलेलं औषध किंवा राहिलेल्या गोळ्या एका मुदतीनंतर कामाचे नसतात. एक्स्पायर झाल्याने ही औषधं फेकून देण्याशिवाय काही पर्याय नसतो. पण त्यांचाही वापर केला जाऊ शकतो. घऱांमधील काही गोष्टींसाठी या औषधांचा वापर होऊ शकतो, ज्यामुळे पैशांचीही बचत होते. 


पांढऱ्या कपड्यांची स्वच्छता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांढरे कपडे नेहमीच आकर्षक दिसतात. परंतु काळानुसार पांढरा रंग फिकट होत जातो, तसंच त्यावर पिवळे डाग दिसू लागतात. कित्येकदा साबणाने धुतल्यानंतरही हे डाग जात नाहीत. अशावेळी मुदत संपलेल्या औषधाने तुम्ही पांढरे कपडे स्वच्छ करु शकतात. 


- एक्स्पायर औषधांची पावडर बनवा 
- यानंतर टबमध्ये टाकून ते पाण्यात मिसळा
- त्यात डिटर्जेंट पावडर टाका
- आता त्यात पांढरे कपडे घालून ते रात्रभर तसेच ठेवा
- सकाळी कपडे घासा आणि पाण्यात चांगले धुवा
- यामुळे कपड्यातील डलनेस कमी होतो आणि नवी चमक येते. 
- तसंच कपडा निर्जंतुक होईल. 


इस्त्रीची स्वच्छता


अनेकदा इस्त्री करताना कपडे जळतात आणि इस्त्री काळवंडते किंवा डाग पडताच. हे फक्त दिसायला खराब नसतं तर इतर हलक्या रंगाच्या कपड्यांवरही डाग लागण्याची भिती असते. ते साफ करणे खूप कठीण होते. पण तुम्ही मुदत संपलेल्या औषधांच्या मदतीने इस्त्रीचा पृष्ठभाग स्वच्छ करू शकता.


- एक्स्पायरी औषध घ्या
- इस्त्री गरम करा.
- आता इस्त्रीला एक्स्पायरी गोळीवर घासून घ्या.
- यानंतर डाग हळूहळू जात असल्याचं तुम्हाला दिसेल 
- स्वच्छ कापडाने स्वच्छ करू शकता


रोपट्यात किटकनाशक म्हणून वापर


आपण सर्वजण आपल्या बाल्कनीत किंवा बागेतील झाडांवर कीटकनाशके वापरतो. अशा परिस्थितीत तुम्ही कीटकनाशकांऐवजी एक्स्पायरी झालेली औषधे वापरू शकता. यासाठी एका ग्लासमध्ये दोन ते तीन औषधे पूर्णपणे मिसळा.


मिश्रण फिल्टर करा, जेणेकरून टॅबलेटचे तुकडे काढून टाकले जातील, तुमचे कालबाह्य झालेले कीटकनाशक तयार आहे. हे मिश्रण स्प्रे बाटलीत टाकून झाडावर शिंपडा, कीटक दूर राहण्यास मदत होईल.