आजच्या आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये अनेक आजार आहेत ज्यांचे औषध एकदा तुम्ही घेतले तर तुमचा आजाब लगेच बरा होतो. अँटीबायोटिक्स घेतल्याने रोग, संक्रमण आणि कोणत्याही प्रकारचे दुखणे काही दिवसांमध्ये लवकर बरे होते. या औषधांचे फक्त सौम्य दुष्परिणाम आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला अँटीबायोटिक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारची औषधे घेतल्यानंतर तुम्ही मद्यपान केले तर शरीराला कोणते नुकसान होते याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. जर तुम्ही दिवसा मद्यपान केले असेल आणि तुम्हाला वाटतेय की तुम्ही रात्री औषधे घेऊ शकता. जर तुम्ही देखील असा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप हनिकारक आहे. असे केल्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकता. 


औषधे घेतल्यानंतर दारू पिणे टाळावे


जर कोणी दिवसा बिअर किंवा वाईन पित असेल तर त्याने रात्री दारू पिऊ नये. Colleen Clayton MD म्हणतात की, मला अनेक वेळा असा प्रश्न विचारला जातो की अँटीबायोटिक्स घेतल्यावर दाऊ पिऊ शकतो का? पण याचं उत्तर सोपे नाही. कारण औषध घेतल्यानंतर मद्यपान केल्याने तुमची पुनर्प्राप्ती मंदावते. त्यासोबतच तुमची उर्जाही कमी होते. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही अँटीबायोटिक्स घेता त्यानंतर तुम्ही दारू पिऊ नये. 


दारू पिल्याने आरोग्यावर होतात वाईट परिणाम 


दारुमधील अल्कोहोलचे परिणाम हे तुमच्या आरोग्यावर होत असतात. या अल्कोहोलचा यकृत, पचन आणि ह्रदयावर मोठा परिणाम होतो. जर तुम्ही देखील वारंवार मद्यपान करत असाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यासोबतच संसर्गजन्य आजारांचा धोका देखील वाढतो. मात्र, जर तुम्ही आधीच आजारी असाल आणि तुम्ही मद्यपान केले तर आजार आणखी वाढू शकतो. 


(CDC)नुसार, आरोग्य सेवा प्रदाते हे दरवर्षी 200 दशलक्ष प्रतिजैविक प्रिस्क्रिप्शन लिहितात. म्हणजे प्रत्येक 10 लोकांसाठी 6 प्रिस्क्रिप्शन आणि ते अनेक प्रकारचे प्रतिजैविक लिहून देतात. जरी ही औषधे प्रत्येक रोगासाठी योग्य नसली तरी काही संक्रमणांवर उपचार करण्यासाठी ते प्रभावी आहेत. 


दाऊ पिऊन औषध घेतल्याने या समस्या उद्भवू शकतात


जर तुम्ही दारू पिऊन त्यानंतर औषध घेतले तर तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की चक्कर येणे. चेहऱ्यावर लालसरपणा येतो. त्यासोबतच डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात. 


टीप: या लेखामध्ये दिलेली माहिती ही मीडिया रिपोर्टनुसार देण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही सूचना अंमलात आणण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा किंवा तज्ञाचा सल्ला घ्यावा.