White Hair Home Remedies in marathi: केस पांढरे होणं ही खूप सामान्य समस्या आहे. अगदी कमी वयातही केस पांढरे होताना दिसून येतात. यामागे अनेक कारणं आहेत जसं की, बदलता आहार, धावपळ, केसांची व्यवस्थित काळजी न घेणं. यामुळे केसांना योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळत नाही म्हणूनचं केस गळणे , केसांना फाटे फुटणे , केस पांढरे होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. आजकाल बाजारात अनेक महागडे प्रोडक्ट आले आहेत. ज्यामुळे पांढरे केस  काळे होतात. पण या सगळ्यांमध्ये अनेक केमिकल्सचा वापर होतो.  यांवर असे काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे तुमचे पांढरे झालेले केस नैसर्गिकरित्या काळे होतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारळाचे तेल


नारळाच्या तेलाचा वापर त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी अनेक वर्षांपासून होत आहे. नाराळाचं तेल हे केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप लाभदायक आहे. आयुर्वेदात नारळाचं तेल खूप गुणकारी मानलं जातं. केसांना दररोज तेल लावल्यानं केसांना पोषण मिळून अनेक समस्या कमी होतात.  नारळाच्या तेलात जर तुम्ही  हे पदार्थ मिसळून केसांना लावलं तर केस नक्कीच काळे होतील. व त्याच बरोबर केसांची वाढ होईल. 


नैसर्गिकरित्या केस कसे पांढरे करायचे? 


पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलात मेथी मिक्स करुन हे तेल केसांना लावू शकता. यामुळे केस काळे होऊन मजबूतही होतात. मेथी हे केसांच्या सर्व समस्यांसाठी रामबाण उपाय समजले जाते. यासाठीच मेथीचं तेल केसांसाठी वापरल्यास अनेक समस्या दूर होवू शकतात. मेथीचं हे तेल तुम्ही घरच्या घरीच तयार करू शकता.  मेथीचं तेल कसं तयार करावं ते कसं वापरावं आणि त्याचे फायदे याबद्दल आज जाणून घेणार आहोत.


असं तयार करा मेथीचं तेल 


साहित्य-  नारळाचे तेल, अर्धी वाटी मेथी, एलोवेरा जेल, काळे तीळ, कडीपत्ता, कडुनिंबाची पाने, तुळशीची पाने, जास्वंदीची फुले, लवंग आणि कांदा 


कृती- मेथीचे दाणे भिजवून त्याला हलक्या उन्हात नीट वाळवून तिची पावडर करावी.यानंतर एका मोठ्या भांड्यात नारळाचं तेल  घ्यावं. यात मेथी आणि काळ्या तीळाची तयार पावडर आणि कांदा टाकून गरम होवू द्यावं.  त्यानंतर यात कडीपत्ता, तुळस आणि कडूनिंबाची पानं घालून 2 मिनिटे शिजू द्यावं. त्यानंतर यात जास्वंदीची फुलं आणि एलोवेरा जेल मिस्क करावं आणि 15 मिनिटं हे तेलं उकळावं. त्यानंतर गॅस बंद करावा.
तेल चांगलं गार होवू दयावं. त्यानंतर गाळून हवाबंद बाटलीत भरून ठेवावं. आठवड्यातून दोन वेळा केसांना हे तेल लावल्यानं तुमचे केस काळे होतील. 



(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)