Fun Fact : विमानाच्या खिडक्या मोठ्या का नसतात अन् गोल का असतात?
Airplane windows shape : विमानाच्या खिडक्यांचा आकार हा गोल का असतो आणि त्या खिडक्या मोठ्या का नसतात तुम्हालाही पडलाय का प्रश्न?
Airplane windows shape : सगळ्यांना विमाननं प्रवास करण्याची इच्छा असते. पण विमानानं प्रवास करताना अनेकांच्या डोक्यात प्रश्न येतात. त्यात विमानाचा रंग, आकार आणि त्यासोबतच त्याच्या खिडक्या. मात्र, सगळ्यात जास्त चर्चा ही खिडकीची असते. त्याचं कारण म्हणजे विमानात जातोय तर खिडकी जवळची सीट आपल्याला मिळायला हवी असं अनेकांना वाटतं. पण जेव्हा खिडकीजवळ लोक बसतात तेव्हा त्या प्रवाशाला एक प्रश्न असतो तो म्हणजे ती खिडकी इतकी छोटी का आहे? इतक्या हजारो फीट उंचावरून प्रवास करत असताना आपल्याला फक्त छोटी खिडकीच का? त्याचं काय कारण आहे ते जाणून घेऊया.
एविएशन एक्सपर्ट एरिका फर्नांडीजनं या मागचं कारण सांगितलं आहे की विमानातून जेव्हा आपण बाहेर पाहतो तेव्हा ते सगळं वातावरण थोडक्यात संपूर्ण दृश्य हे अविश्वनीय असतं. नॅच्युरल लाइट देखील आत येते. मात्र, अशी अनेक कारणं आहेत, ज्यामुळे विमानाच्या खिडक्या या छोट्या असतात. अती उंचीवर गेल्यानंतर विमानात खूप जास्त दबाव असतो. वातावरणात सतत बदल होत असतात. अशा अनेक परिस्थितींना तोंड देण्यासाठी अशा खिडक्या बनवण्यात आल्या आहेत. खिडक्या या विमानाच्या वरच्या भागत असतात त्यामुळे त्या जर मोठ्या केल्या तर संपूर्ण विमानाची रचना कमकूवत होईल. विमानाचं संतुलन बनवूण ठेवण्यासाठी खिडक्या छोट्या ठेवण्यात येतात.
हेही वाचा : 'पुष्पा'च्या शूटिंगसाठी तुरुंगातून बाहेर आला 'हा' अभिनेता!
मोठ्या आकाराच्या खिडक्या असतील तर विमानाच्या अंतर्गत हवेचा प्रवाह प्रभाविक होऊ शकतो. त्यामुळे विमानातील इंटरनल प्रेशर वाढून ते स्थीर राहणार नाही. विमानाच्या खिडक्या छोट्या आकाराच्या असल्यानं विमानातील हवेचा दबाव नियंत्रणात राहण्यास मदत होते. मोठ्या खिडक्या असल्यास हवेचा दबाव हा नियंत्रणात राहणार नाही आणि त्यामुळे विमान क्रॅश होण्याची शक्यता असते.
कशा बनवण्यात येतात खिडक्या?
विमानात असलेल्या खिडक्या या विशेष धातू पासून बनवण्यात येतात. ज्यामुळे त्या इतक्या मजबूत राहतात. याचा अर्थ असा की चुकून कधी कोणत्या पक्ष्यानं किंवा कोणत्या गोष्टीची धडक बसली तरी खिडकी तुटणार नाही. खिडकीला अनेक कोटिंग्स असतात. ज्या कोणत्याही तापमानात तुम्हाला सेफ ठेवू शकतात. हीटला देखील ट्रान्सफर करतात. तर या सगळ्यानं प्रवाशांना आराम मिळतो. खिडक्या चौकोनी नसतात कारण त्या हवेचा दाब सहन करू शकत नाही आणि लगेच तुटू शकतात. त्यामुळे त्या थोड्या निमुळत्या असल्यानं प्रेशर व्यवस्थित राहतो. तर या सगळ्यामुळे खिडकी तुटण्याची शक्यता फार कमी असते.