Mens And Womens Shirts Button On Different Sides News In Marathi : सध्याच्या युगात स्त्री-पुरुषांना आवडतील असेच कपडे घालतात. यासोबतच अनेक नवीन कपडेही बाजारात येऊ लागले आहेत. सुरुवातीला फक्त पुरुष शर् घालत होते. मात्र आता महिला देखील शर्ट घालताना दिसतात. पण,महिला आणि पुरुषांच्या शर्टमध्ये काही फरक आहे. पुरुषांच्या शर्टला उजवीकडे बटणे असतात तर महिलांच्या शर्टला डावीकडे बटणे असतात. हे फॅशनसाठी केले जात नसून त्यामागे अनेक कारणे आहेत. याबाबत जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर,पूर्वेच्या काळी पुरुष उजव्या हातात तलवार धरायचे आणि स्त्रिया डाव्या हाताला मुलांना धरत. अशा परिस्थितीत जेव्हा त्या माणसाला शर्टाची बटणे उघडायची किंवा लावायची असतील तर तो यासाठी डाव्या हाताचा वापर करत असे. जर डावा हात वापरला जात असेल तर शर्टचे बटण उजवीकडे असावे. याउलट स्त्रिया आपल्या मुलाला डाव्या बाजूला धरत असत. बाळांना दूध पाजण्यासाठी शर्टची बटणे काढताना त्यांना उजव्या हाताचा वापर करावा लागला. यामुळे बटणे डाव्या बाजूला केली गेली.


नेपोलियन कनेक्शन बद्दल बोलायचं झालं तर, नेपोलियन बोनापार्टने महिलांच्या शर्टची बटणे डावीकडे असावीत असा आदेश दिला होता. कथेनुसार, नेपोलियन नेहमी त्याच्या शर्टमध्ये एक हात ठेवत असे. अनेक महिला त्याचे अनुकरण करु लागल्या. त्याचे अनुकरण करण्यासाठी, नेपोलियनने महिलांच्या शर्टमध्ये अधिक बटणे जोडण्याचे आदेश जारी केले. मात्र, यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही. परंतु, काही कथांच्या आधारे लोक ते खरे असल्याचे मानतात.


तसेच पूर्वीच्या काळी स्त्रिया एका बाजूला दोन्ही पाय टाकून प्रवास करायचं. त्यामुळे डावीकडे बटणे लावल्यास वारा त्यांच्या शर्टच्या आत विरुद्ध दिशेने जायचा. याशिवाय काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महिला आणि पुरुषांच्या कपड्यांमध्ये फरक निर्माण करण्यासाठी त्यांच्या शर्टची बटणे वेगवेगळ्या बाजूंनी लावली गेली.