Beer Bottles Colour : फार कमी लोक असतील त्यांना बियर म्हणजे काय हे माहित नसेल. पम बहुतेक लोक बीअरशी परिचित असतील.  आपल्या सर्वांना माहिती दारु आरोग्यासाठी हानीकारक असते. तरी मद्यपान करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काहीजण बिअर पिणे फायदेशीर असल्याचेही म्हणतात. पण आज आम्ही तुम्हाला त्याचे कोणतेही फायदे किंवा तोटे सांगणार नाही. पण एक प्रश्न असा आहे की बिअर कोणत्याही ब्रँडची असू पण तिच्या बाटलीचा रंग हा फक्त हिरव्या किंवा तपकिरी असतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सर्वात जुन्या पेयांमध्ये चहानंतर पाणी तिसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे बियर . जुन्या आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी 43,52,65,50,00,000 बियरच्या कॅनच विक्री होते. आजच्या जगात, आपल्या पबमधला पार्टीचा मूड असो किंवा मित्रांसोबत पार्टीचा मूड असो, शक्यतो बियरच जास्त सेवन केले जाते. बिअरच्या बाटल्या नेहमी हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात. या दोन रंगांव्यतिरिक्त, इतर कोणत्या रंगाच्या बाटल्या तुम्ही पाहिल्या नसतील. त्यामागाचं असं कारण आहे की, पहिली बिअर कंपनी हजारो वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तमध्ये सुरू झाली असे मानले जाते. त्यानंतर बिअर पारदर्शक बाटल्यांमध्ये पॅक केली जात होती. त्यानंतर असे दिसून आले की जेव्हा बिअर कॅन किंवा बाटल्यांमध्ये पॅक केली जाते तेव्हा सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे बिअर खराब होत होती. त्यामुळे उग्र वास येऊन लोक बियर पिय्याला नकार देत होते. 


हीच समस्या सोडवण्यासाठी बिअर उत्पादकांनी एक योजना आणली. त्याअंतर्गत बिअरसाठी ब्राऊन कोटेड बाटल्या निवडण्यात आल्या. ही युक्ती कामी आली असून नंतर पॅकींगच्या वेळी बियरच्या या रंगीत बाटल्यांमध्ये ठेवायला सुरुवात झाली.  कारण सूर्याच्या किरणांचा तपकिरी बाटल्यांवर परिणाम होत नव्हता. तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर तपकिरी बाटल्यांचा तुटवडा जाणवू लागला. या रंगाच्या बाटल्या सापड नव्हत्या. दुर्दैवाने, बिअर उत्पादकांना सूर्यप्रकाशाचा नकारात्मक परिणाम होणार नाही असा रंग निवडावा लागला. त्यानंतर, तपकिरी रंगाऐवजी हिरवा रंग निवडला गेला. तेव्हापासून बिअर हिरव्या बाटल्यांमध्ये येऊ लागली.