पालक घरात बाळ जन्माला आलं की, त्याच्यासाठी अनोख्या आणि हटके नावाचा विचार करतात. अनेकदा पालक बाळाच्या जन्माची तिथी किंवा सण-वार पाहूनही नाव ठेवतात. सध्या अशाच एका नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. ते नाव आहे जहांगीर चिन्मय मांडलेकर. अभिनेता आणि लेखक चिन्मयने मुलाचं नाव 'जहांगीर' का ठेवलं यावरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं. पहिल्यांदाच चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने नेहाने 'जहांगीर'च्या नावामागची गोष्ट सांगितली आहे. 


जहांगीरच्या नावाचा गोष्ट 



नेहा आणि चिन्मय यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं आहे. जहांगीरचा जन्म 21 मार्च 2013 रोजी झाला. या दिवशी जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्मदिवस असतो. त्यांच्या नावावरुन 'जहांगीर' हे नाव ठेवण्यात आलं.  ‘जहांगीर’ हे पर्शियन नाव आहे. मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे. ‘जहांगीर’ म्हणजे जगज्जेता. हा जग जिंकलेला ‘जहांगीर’.


भारतातील राजांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे 


सम्राट
सम्राट अशोकाला कोण ओळखत नाही? त्यांनी अनेक वर्षांपासून भारताची संस्कृती आणि वारसा जपला आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव महान शासक अशोकाच्या नावावर ठेवू शकता. 


माधव
जे पालक आपल्या मुलासाठी 'म' ने सुरु होणारे सुंदर नाव शोधत आहेत त्यांना 'माधव' हे नाव नक्कीच आवडेल. भगवान श्रीकृष्णांना 'माधव' नावानेही ओळखले जाते. पेशवा माधवराव यांनी 1774 ते 1795 पर्यंत राज्य केले. माधव म्हणजे मधासारखा गोड.


पृथ्वी 
ज्यांना आपल्या मुलाला एखादे ऐतिहासिक नाव द्यायचे आहे, त्यांच्यासाठी 'पृथ्वी' हे नाव खूप चांगले राहील. केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला 'पृथ्वी' हे नाव नक्कीच आवडेल. पृथ्वीराज चौहान यांचे नाव तुम्ही ऐकले असेलच. त्यांच्या शौर्याच्या कहाण्या आजही सांगितल्या जातात.


विक्रमादित्य


तुम्ही तुमच्या मुलाचे नाव महाराज 'विक्रमादित्य' देखील ठेवू शकता. हे नाव लहान करून तुम्ही विक्रम हे नाव निवडू शकता. विक्रमादित्यने 655 ते 680 पर्यंत राज्य केले. विक्रम या नावाचा अर्थ शौर्याचे प्रतीक आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे नावही वासुदेव ठेवू शकता. त्याने 190 ते 230 पर्यंत राज्य केले. भगवान श्रीकृष्णाच्या वडिलांचे नावही वासुदेव होते. तुम्ही तुमच्या बाळासाठी हे सुंदर नाव निवडू शकता.