14-15 जानेवारी रोजी देशात जल्लोषात 'मकर संक्रांत' हा सण साजरा केला जातो. नवीन वर्षाची सुरुवात 'मकर संक्रांत' या सणाने होते. प्रत्येक घरात तिळगुळ दिले जातात. बाजारत पतंग देखील पाहायला मिळत आहे. या दिवशी आंघोळ, तिळ गुळ आणि दान देखील केले जाते. तसेच पतंग देखील उडवली जाते. या दिवसाचे आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे काळ्या रंगाचे कपडे. या दिवशी काळ्या रंगाची पूजा केली जाते. काळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. 


मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देशात मकर संक्रांत वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते. प्रत्येक धर्मात हा सण विशेष दिवस म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रात या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. कारण या दिवसांमध्ये सर्दी सुरु होते आणि पाणझडीचे दिवस देखील असतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये उष्णता निर्माण केली जाते. शरीर गरम राहण्यास मदत होते. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे. म्हणून तीळ-गूळ देण्याची प्रथा पडली. वर्षभरात कुणाशीही भांडणं झालं असेल, तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ देऊन ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला' हा संदेश देण्याची प्रथा आहे.


मकर संक्रांतीचे महत्त्व


 हिंदू धर्मानुसार, मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते. तसेच मकर संक्रांतीपासून थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडं सरकतो.


मकर संक्रांती शुभ मुहूर्त 


 मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं. पंचांग नुसार यंदा मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9.03 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी 5.46 पर्यंत चालेल.


काळ्या रंगाचं महत्त्व


मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. काळा रंग हा अशुभ नाही. सौभाग्य लेणं मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा झी 24 तासशी कोणताही संबंध नाही तसेच आम्ही याला दुजोरा देत नाही.)