Blood Tests for Heart: हृदयविकार हा अत्यंत गंभीर आजार आहे. हृदयाचे आजार जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. परंतु नियमित रक्त चाचण्यांद्वारेनिरीक्षण केल्याने लवकर निदान होऊन तुमचा धोका कमी करण्यात मदतहोऊ शकते. या चाचण्या आपल्याला हृदयाच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देतात. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या मुख्य रक्त चाचण्या करायला पाहिजे याबद्दल माहित असणे आवश्यक आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांच्याकडून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिपिड प्रोफाइल
लिपिड प्रोफाइल तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी मोजते, जे हृदयरोगाच्या जोखमीचे महत्वाचे संकेतक आहेत. 


हाय सेन्सीटीव्हीटी सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन (एचएस-सीआरपी)
या चाचणीमध्ये सुजेमुळे यकृताने तयार केलेला भागअर्थात सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) ची पातळी मोजली जाते. सीआरपीपातळी मुळे शरीरावर सूज येऊ शकतेज्यामुळे हृदयरोगहोण्याची शक्यता वाढते. सामान्य कोलेस्टेरॉलची पातळी असलेल्या व्यक्तींमध्येही सीआरपीपातळीवाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. १एमजी/एल पेक्षा कमी असेल धोका कमी असे मानले जाते. पातळी ३ एमजी/एल च्या पेक्षा जास्त असेल तर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जास्त धोका असतो.


बल्ड ग्लुकोज चाचणी
रक्तातील साखरेची वाढलेली पातळी म्हणजे मधुमेह किंवा पूर्व-मधुमेह, हे दोन्ही हृदयविकाराचे प्रमुख जोखीम घटक आहेत. फास्टींग ग्लुकोज टेस्ट मध्ये काही तासांच्या उपवासानंतर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण मोजण्यात येते.फास्टींग ग्लुकोज पातळी १०० एमजी/डीएलपेक्षा कमी असणे म्हणजे पातळी योग्य आहे असे मानले जाते. दीर्घकालीन अनियंत्रित रक्त शर्करा रक्तवाहिन्या आणि हृदयाला नुकसान पोहोचवू शकते, त्यामुळे नियमित निरीक्षण आवश्यक आहे.


हिमोग्लोबिन 
मधुमेह असलेल्या किंवा धोका असलेल्या व्यक्तींसाठी, एचबीए१सीचाचणी मध्येमागीलतीन महिन्यांतील सरासरी रक्तातील ग्लुकोज पातळी मोजलीजाते. एचबीए१ सीपातळी ५.७% च्या खाली ठेवल्यास मधुमेहींमध्ये हृदयाशी संबंधित गुंतागुंत कमी होण्यास मदत होते. 


कोलेस्टेरॉल, सूज आणि रक्तातील साखरेसाठी नियमित रक्त चाचण्या तुमच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल अमूल्य माहिती देतात. याचे नियमित निरीक्षण करून, तुम्ही हृदयविकार रोखण्यासाठी आणि निरोगी हृदय राखण्यासाठी तुमच्या डॉक्टरांकडून मदत घेऊ  शकता.