Yoga vs Gym For Fitness : योगा की जिम, आयुष्यभर तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तम काय? तज्ज्ञ सांगतात...
Yoga vs Gym For Fitness : जेव्हा तुम्हाला निरोगी राहण्यासाठी योग किंवा जिमिंग यापैकी एक निवडाव करायची आहे. अशावेळी तुम्हाला त्यांचे फायदे आणि तुमच्यासाठी काय योग्य आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की...
Yoga vs Gym For Fitness : निरोगी आणि फिट राहण्यासाठी आजची तरुण पिढी ही जिमला प्राधान्य देते. त्यामुळे तरुणांमध्ये जिमला जाण्याचा ट्रेंड वाढलाय. तर दुसरीकडे शरीरासह मानसिक आरोग्यासाठी योगा हे उत्तम असल्याच वयस्कर लोक म्हणतात. खरं तर जिम आणि योगा करणारे दोन वर्ग आपल्याला पाहिला मिळतात. बॉलिवूड अभिनेत्रीदेखील योगा आणि जिम करताना दिसतात. पण आजच्या अभिनेत्री या योगाला जास्त प्राधान्य देतात. अशावेळी डोळेझाकून त्यांचं अनुकरण करण्यापेक्षा नेमकं जिम की योगा कुठलं आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या. (Yoga or gym which is better for lifelong fitness Experts say)
जिम वर्कआऊट की योगा, याबद्दल कंफ्यूज आहात?
आरोग्य आणि शरीराच्या ताकदीसाठी, योग आणि जिम दोन्ही सर्वोत्तम मानलं गेलं आहे. जर तुम्ही यापैकी कोणतीही शारीरिक क्रिया निवडली तर तुम्हाला फायदा नक्कीच मिळेल. वजन कमी करण्यासाठी जिम किंवा वर्कआउट सर्वोत्तम मानलं जातं, तर योगासने केल्याने मानसिक शांती लाभते.
1- योगामध्ये योगिक क्रिया केल्याने आंतरिक आरोग्य सुधारण्यास सुरुवात होण्यास मदत मिळते. तर जिम किंवा वर्कआउट केल्याने शरीराला जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो.
2- तुम्ही जिमच्या आधी योगासने करू शकता, जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणतीही व्यायाम केला नसाल तर जिममध्ये जाण्याऐवजी योग करणे तुम्हाला फायदेशीर ठरले.
3- जर तुम्हाला मुद्रा, लवचिकता सुधारायची असेल किंवा सांधेदुखी सारख्या समस्या असतील तर योग करणे कधीही उत्तम आहे.
4- योगामध्ये श्वासोच्छवास आणि ध्यान यासारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित होण्यास मदत मिळते. हृदयरोगींनी जलद व्यायामाऐवजी योगासने केल्यास त्यांचे हृदय निरोगी राहण्यास फायदा होतो, असं तज्ज्ञ सांगतात.
5- तुमच्या शरीराच्या अंतर्गत भागांना निरोगी ठेवण्यासाठी योगासने अधिक उपयुक्त मानले जाते.
6 - योग करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तो तुम्ही घरी करू शकता. यासाठी उपकरणे किंवा जास्त जागेची आवश्यकता नसते. फक्त योगा मॅट तेवढं लागतं.
7 - काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते फक्त एक प्रकारची शारीरिक व्यायाम करण्याऐवजी, व्यायामशाळा आणि योगासने असं कॉम्बो सर्वोत्कृष्ट मानले जाते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)