IND vs ENG Highlights, Semi Final T20 World Cup : टीम इंडियाचा दारूण पराभव, इंग्लंडकडून 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून पराभव

Thu, 10 Nov 2022-4:40 pm,

India vs England T20 World 2022 Semi Final LIVE Score: विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या तुफान खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 168 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य असणार आहे.

IND vs ENG T20 World 2022 Semi-Final LIVE Updates: तिथे 2022 च्या टी20 वर्ल्ड कप सामन्याच्या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला नमवत World Cup च्या Final मध्ये धडक मारली. त्यानंतर आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा भारत विरुद्ध इंगलंड सामन्यावर लागल्या आहेत. भारतानं हा सामना जिंकल्यास जेतेपदासाठी पुन्हा एकदा India Vs Pakistan अशी लढत पाहता येणार आहे. तर, तिथे इंग्लंडचा संघही अॅडलेडमध्ये भारताचा विजयी रथ रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसणार आहे. मुख्य म्हणजे या सामन्यावर पावसाचीही वक्रदृष्टी असल्यामुळे सामन्यात ही एक अडचण नको, असाच सूर क्रिकेटप्रेमी आळवताना दिसत आहेत. अशा या बहुप्रतिक्षित सामन्याच्या Live Upates खालीलप्रमाणे... 


 

Latest Updates

  • IND vs ENG Semi Final LIVE Score : टी 20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, सेमी फायनल लढतीत इंग्लंडने 4 ओव्हर आणि 10 विकेटसने पराभूत केले. जॉस बटलर 80 आणि अलेक्स हेल्स 86 बिन बाद खेळी करत भारताचा पराभव केला.  

  • IND vs ENG Semi Final LIVE Score : टीम इंडिया पराभवाच्या छायेत, इंग्लंड विजयापासून 13 धावा दुर 

  • IND vs ENG Semi Final LIVE Score : अलेक्स हेल्स पाठोपाठ जोस बटरलचं अर्धशतक, इंग्लंड मजबूत स्थितीत पोहोचली आहे. विजयापासून आता अवघ्या धावा दुर आहे.  
    इंग्लंड : 140/0

  • IND vs ENG Semi Final LIVE Score : इंग्लंड संघाने 100 धावा पुर्ण केल्या आहेत. जॉस बटलर 37 आणि अलेक्स हेल्स 65 धावांवर खेळत आहेत. 
    इंग्लंड : 106/0

  • IND vs ENG Semi Final LIVE Score : एलेक्स हेल्सच अर्ध शतक इंग्लंड च्या 9 ओव्हर मध्ये 91 धाव 

    नववी ओव्हरमध्ये इंग्लंडच्या 91 धावा, मात्र अद्यापही भारताचे गोलंदाज विकेट मिळविण्यात अपयशी, अॅलेक्स हेल्स ची तुफान फटकेबाजी 

  • IND vs ENG Semi Final LIVE Score :  इंग्लंडच्या अलेक्स हेल्सने अर्धशतक ठोकलं आहे. 28 बॉलमध्ये त्याने हे अर्धशतक ठोकलंय. या अर्धशतकानंतर इंग्लंड विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. 
    इंग्लंड : 84/0

  • IND vs ENG Semi Final LIVE Score :  इंग्लंडच्या अलेक्स हेल्सने अर्धशतक ठोकलं आहे. 28 बॉलमध्ये त्याने हे अर्धशतक ठोकलंय. या अर्धशतकानंतर इंग्लंड विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. 
    इंग्लंड : 84/0

  • IND vs ENG Semi Final LIVE Score :  इंग्लंडच्या अलेक्स हेल्सने अर्धशतक ठोकलं आहे. 28 बॉलमध्ये त्याने हे अर्धशतक ठोकलंय. या अर्धशतकानंतर इंग्लंड विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. 

  • IND vs ENG Semi Final LIVE Score: इंग्लंड इनिंग - आठवी ओव्हर
     

    आठ ओव्हरमध्ये इंग्लंडने कुटल्या 64 धावा, दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडला दिली चांगली सुरुवात

     

  • IND vs ENG Semi Final LIVE Score :  इंग्लंडची वादळी सुरूवात... 5 ओव्हरमध्ये 52 धावा कुटल्या.

    169 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स मैदानावर..दोघांची तुफान फटकेबाजी!

  • IND vs ENG Semi Final LIVE Score : टीम इंडियांचं इंग्लंडंसमोर 169 धावांचं आव्हान, भारत : 168/6

    विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या तुफान खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 168 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य असणार आहे. शेवटच्या बॉलवर हार्दीक आऊट 63 धावावर आऊट झाला आहे. 
     
    भारत : 168/6

  • IND vs ENG Semi Final LIVE Score : विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या तुफान खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 168 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य असणार आहे. शेवटच्या बॉलवर हार्दीक आऊट 63 धावावर आऊट झाला आहे. 
     भारत : 168/6

  • IND vs ENG Semi Final LIVE Score :टीम इंडियाला पाचवा धक्का बसला आहे. रिषभ पंत स्वस्तात बाद झाला आहे. 

  • IND vs ENG Semi Final LIVE Score :  विराट कोहलीनंतर आता हार्दिक पंड्याने अर्धशतक ठोकले आहे. हार्दिकने 29 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलंय. 
    भारत : 155/4

  • IND vs ENG Semi Final LIVE Score :  विराट कोहली अर्धशतक करून बाद झाला आहे. कोहली बाद झाल्यामुळे भारताची धावसंख्या आणखीण कमी होण्याची शक्यता आहे. 
    भारत : 136/4

     

  • IND vs ENG Semi Final LIVE Score : विराट कोहलीचं शानदार अर्धशतक, 39 चेंडूत 50 धावा

    मोक्याच्या क्षणी विराट कोहलीने ठोकलं अर्धशतक, 39 बॉलमध्ये पुर्ण केलं अर्धशतक 
     

  • IND vs ENG Semi Final LIVE Score,T20 World Cup: रशिदने सुर्याला फसवलं! सुर्यकुमार यादव 14 धावावर आऊट

      टीम इंडिया तिसरा धक्का... सलग तीन अर्धशतक ठोकणारा सुर्यकुमार तंबूत परतला

     

  • IND vs ENG Semi Final LIVE Score : टीम इंडियाचा फॉर्ममध्ये असलेल्या बॅट्समन सुर्यकुमार यादव 14 धावावर आऊट झाला आहे. राशीदच्या बॉलवर तो गंगनचूंबी सिक्स मारताना आऊट झाला आहे. 
    भारत : 75/3

     

  • IND vs ENG Semi Final LIVE Score : टीम इंडियाने 10 ओव्हरमध्ये 62 धावा ठोकल्या आहेत. विराट कोहली चांगला सेट झाला आहे, तर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सुर्या मैदानात उतरला आहे. 
    भारत : 62/2 

  • IND vs ENG Semi Final LIVE Score : कर्णधार रोहित शर्मा 27 धावांवर बाद

  • IND vs ENG Semi Final LIVE Score :  टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा 27 धावांवर बाद झाला आहे. क्रिस जॉर्डनच्या बॉलवर तो कॅच आऊट झाला आहे. 
    भारत : 56/2

  • IND vs ENG Live Updates T20 World Cup 2nd Semi Final :  टीम इंडियाने 5 ओव्हरमध्ये 31 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 14  आणि विराट 11 वर खेळतोय 
    भारत : 31/1 

  • IND vs ENG Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : के एल राहुल ५ धावांवर बाद 

    टीम इंडियाची खराब सुरुवात, के एल राहूल 5 धावावर बाद झाला आहे. वोक्सने त्याची विकेट घेतली आहे. 
    भारत : 9/1 

  • IND vs ENG Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : टीम इंडियाची खराब सुरुवात, के एल राहूल 5 धावावर बाद झाला आहे. वोक्सने त्याची विकेट घेतली आहे. 
    भारत : 9/1 

  • Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : भारतीय संघाची एकूण कामगिरी पाहता प्लेइंग 11 मध्ये फारसे बदल असतील अशा अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. कारण रोहितनं सुपर 12 फेरीमध्ये झालेल्या 5 पैकी 3 सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नव्हता. उर्वरित दोन सामन्यांमध्ये जे बदल झाले ते फक्त 2 जागांसाठीच होते. आता यावेळी रोहित संघात कोणाला संधी देतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल. यामध्ये ऋषभ पंत की कार्तिक, अक्षर पटेल, दीपक हुड्डा की चहल , आणि ओपनिंग साठी के.एल. राहुलचं स्थान कायम राहणार की तिथेही बदल होणार याकडेच सर्वांचं लक्ष असेल. 

    वाचा : IND vs ENG T20 WC: 2 जागा 5 दावेदार; Rohit Sharma सेमीफायनलच्या प्लेईंग 11 मध्ये कोणाला देणार संधी?

     

  • Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final :  भारतीय क्रिकेट इंग्लंडशी दोन हात करत टी20 वर्ल्ड कपच्या Final मध्ये धडक मारण्यासाठी सज्ज झाला आहे. संघातील खेळाडूंची कामगिरी, दुखापतग्रस्त खेळाडूंना सावरण्यासाठीही मेहनत, संघातील उणीवा भरुन काढण्यासाठीची धडपड आणि चांगली कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देत संघ टप्प्याटप्प्यानं पुढेही आला आहे. आता फक्त इंग्लंडला नमवलं, म्हणजे T20 World Cup च्या Final चं तिकिट कन्फर्म. (T20 World Cup not a single team won the match after winning the toss in Adelaide Oval will rohit sharma loose ). हे गणित वाटतं तितकं सोपं नाही. कारण, आतापर्यंत Adelaide Oval मध्ये जवळपास 11 टी 20 सामने झाले आहेत. पण, आकडे पाहता निकाल मात्र चकित करणारा आहे. कारण, जो संघ इथे Toss जिंकतो तो सामना जिंकत नाही. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचीच आकडेवारी पाहिली तर, अॅडलेड ओवलमध्ये आतापर्यंत 6 सामने झाले. यामध्ये जे संघ टॉस जिंकले त्यांना सामना गमवावा लागला. भारतीय संघ या मैदानात बांगलादेशविरोधात (Ind vs ban) खेळला. पण, यावेळी टॉस बांगलादेशनं जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाची करण्याचं आव्हान दिलं होतं. 

     

  • Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final :  भारतीय संघाला तुम्हीही देऊ शकता शुभेच्छा... कसं? पाहा... 

  • Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : भारताचा संघ पहिल्यांदाच आयसीसीच्या एखाद्या स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीशिवाय खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळं माहीच्या तुफानी खेळीशिवाय संघ अपेक्षित कामगिरी करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 

    वाचा : T20 World Cup : 'या' तुफानी खेळाडूशिवाय भारतीय संघ इंग्लंडविरोधात खेळणार; पहिल्यांदाच त्याची अनुपस्थिती

  • Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : अॅडलेडवर भारतीय संघाची कामगिरी पाहता आकडे Team India चं पारडं जड असल्याचीच बाब अधोरेखित करतात. इथं भारतीय संघानं 30 सामने खेळले असून त्यापैकी 13 सामन्यांमध्ये संघ विजयी ठरला आहे. तर 13 सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. इथं 1 सामना बरोबरीत निकाली निघाला तर, 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. 

  • Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final :  टीम इंडिया आणि इंग्लंडचा संघ आतापर्यंत 22 वेळा आमनेसामने आला आहे. यामध्ये भारतीय संघ 12 वेळा विजयी झाला आहे. 

    वाचा : Virat Kohli : विराट कोहली आज अ‍ॅडलेडमध्ये 'हा' विश्वविक्रम मोडणार? केवळ इतक्या धावांची गरज

     

  • IND vs ENG 2nd Semi-Final Latest Updates : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज सेमी फायनलची दुसरी ( Ind vs Eng Semi final) मॅच रंगणार आहे. अ‍ॅडलेडच्या ओव्हल मैदानावर दोन्ही टीम्स एकमेकांना भिडणार आहेत. आजची मॅच जिंकणाऱ्या टीमची लढत फायनलमध्ये पाकिस्तानशी (Pakistan) होणार आहे. आजची मॅच जिंकून फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्यानं टीम इंडिया आणि इंग्लंड मैदानात उतरतील. (ICC T-20 World Cup)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link