Virat Kohli : विराट कोहली आज अ‍ॅडलेडमध्ये 'हा' विश्वविक्रम मोडणार? केवळ इतक्या धावांची गरज

 IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज सेमी फायनल होत आहे. यासामन्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. अंतिम फेरीत कोण जाणार याचीच उत्सुकता आहे. आता टीम इंडिया माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ज्या फॉर्ममध्ये आहे, ते बघता त्याच्याबद्दल एवढेच सांगता येईल की तो आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडेल. T20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही विराटच्या नावावर आहे. 

Updated: Nov 10, 2022, 07:43 AM IST
Virat Kohli : विराट कोहली आज अ‍ॅडलेडमध्ये 'हा' विश्वविक्रम मोडणार? केवळ इतक्या धावांची गरज   title=

Virat Kohli in T20 World Cup 2022: टीम इंडिया आणि इंग्लड यांच्यात आज सेमीफायनल होत आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या खेळाकडे लक्ष लागले आहे. T20 विश्वचषकच्या (T20 World Cup-2022) चालू हंगामात तो जोरदार खेळला आहे. आता  विराट कोहली हा आपला विश्वविक्रम मोडण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विश्वविक्रम इतर कोणाच्या नावावर नाही. तो त्याच्याच नावावर आहे. या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी त्याला काही धावांची गरज आहे.

अ‍ॅडलेडमध्ये इंग्लंड विरुद्ध सामना

सलामीवीर रोहित शर्मा  (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने T20 World Cupच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आता जेतेपदासाठी इंग्लंडशी लढत होत आहे. हा सामना अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर आज 10 नोव्हेंबर रोजी होत आहे. टीम इंडियाने सुपर-12 फेरीतील गट-2 मध्ये अव्वल स्थान मिळवताना उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने सुपर-12 फेरीत फक्त एकच सामना गमावला आणि 4 सामने जिंकले. त्यांचा एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला.

विराट स्वतःचाच विक्रम मोडणार?

आघाडीचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आपलाच विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. तो ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे, त्यावरुन कोहली पुन्हा एकदा इतिहास रचणार असे दिसत आहे. विराटने  T20 World Cupच्या चालू मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 5 पैकी 3 डावात अर्धशतके झळकावली आहेत. त्याचा फॉर्म पाहता, असे म्हणता येईल की तो स्वतःचा एक विक्रम मोडेल. हा विक्रम त्याने T20 World Cup 2014 मध्ये केला होता.

उपांत्य फेरीत विराटला संधी

विराट याने आतापर्यंत T20 World Cupच्या 5 डावात एकूण 246 धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. T20 विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही विराटच्या नावावर आहे. बांग्लादेशमध्ये 2013-14 T20 World Cupत त्याने 6 डावात 319 धावा केल्या होत्या. त्यानंतर हा विक्रम कोणीही मोडलेला नाही. विराट स्वतः या विक्रमापासून 74 धावा दूर आहे. उपांत्य फेरीत विराट कोहलीला मोठी संधी असेल. 

सूर्यकुमारही स्पर्धेत

या यादीत सूर्यकुमार यादव यांचाही समावेश आहे. त्याने आतापर्यंत 5 डावात एकूण 225 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँडचा मॅक्स ओड आहे ज्याने 8 सामन्यात एकूण 242 धावा केल्या आहेत. नेदरलँड्स बाहेर असले तरी अशा परिस्थितीत संधी विराट आणि सूर्यकुमार यांच्याकडे आहे.