T20 World Cup : 'या' तुफानी खेळाडूशिवाय भारतीय संघ इंग्लंडविरोधात खेळणार; पहिल्यांदाच त्याची अनुपस्थिती

क्रिकेट चाहत्यांमध्ये संघाच्या प्लेइंग 11 (team india playing 11) पेक्षा त्याच्या नसण्याचीच जास्त चर्चा; पाहा तो आहे तरी कोण  

Updated: Nov 10, 2022, 08:45 AM IST
T20 World Cup : 'या' तुफानी खेळाडूशिवाय भारतीय संघ इंग्लंडविरोधात खेळणार; पहिल्यांदाच त्याची अनुपस्थिती  title=
T20 World Cup team india to play against england without ms dhoni for the first time

T20 World Cup : (Indian Cricket Team) भारतीय क्रिकेट संघ टी20 वर्ल्ड कपमध्ये आज (गुरुवार 10 नोव्हेंबर 2022) इंग्लंडच्या (Ind vs eng) संघाविरुद्ध उपांत्य सामना खेळण्यासाठी मैदानात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संघातील खेळाडूंनी जोमानं तयारीही केली आहे. दुखापतग्रस्त खेळाडूही त्यांच्या परिनं सावरले असून, संघाला विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. असं असलं तरीही संघात एका खेळाडूची उणीव मात्र सतत जाणवणार आहे. या खेळाडूशिवाय पहिल्यांदाच भारतीय संघ टी20 च्या नॉकआऊटमध्ये खेळणार आहे. 

जवळपास 2019 नंतर असं पहिल्यांदाच होणार असून, हा अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे, महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni). माहीशिवाय Team India साधारण तीन वर्षांनंतर ICC कडून आयोजित स्पर्धेतील नॉकआऊट सामना खेळणार आहे. मागील वर्षी पार पडलेला वर्ल्ड टेस्ट चँम्पियनचा अंतिम सामना यासाठी अपवाद होता. पण, ती क्रिकेट मालिका नसून एकच सामना होता. 

वाचा : Virat Kohli : विराट कोहली आज अ‍ॅडलेडमध्ये 'हा' विश्वविक्रम मोडणार? केवळ इतक्या धावांची गरज

 

माही शेवटचा नॉकआऊट कधी खेळला होता? 

भारतीय संघानं 2019 मध्ये आयसीसी नॉकआऊटमध्ये धडक मारली होती. त्यावेळी संघ न्यूझीलंडविरोधात (new zealand) खेळला होता. MS Dhoni साठी तो अखेरचा नॉकआऊट सामना होता. 

MS Dhoni की ताज़ा खबरे हिन्दी में | ब्रेकिंग और लेटेस्ट न्यूज़ in Hindi -  Zee News Hindi

आतापर्यंतची जेतेपदं... 

2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर धोनीनं त्याच्या हाती संघाची धुरा असताना Team India ला 2007 टी20 वर्ल्ड कप, 2011 एकदिवसीय वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली होती. त्यानं कर्णधारपद सोडल्यानंतर (Virat Kohli) विराट कोहलीच्या हाती संघाची सूत्र आली पण, आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेचं जेतेपद संघाला मिळवता आलं नाही. आता (Rohit Sharma ) रोहित शर्मा संघाला हे जेतेपद मिळवून देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.