ठाणे महापालिका निवडणूक निकाल

Fri, 24 Feb 2017-10:24 am,

Latest Updates

  • ठाण्याच्या प्रभाग 16 मधून शिवसेना पॅनल तर प्रभाग ६ मधून राष्ट्रवादीचं पॅनल विजयी

  • प्रभाग क्रमांक ६ मध्ये राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजयी

  • ठाणे प्रभाग क्रमांक ५ मधून सुधाकर चव्हाण पराभूत, शिवसेनेच्या परिशा सरनाईक यांचा विजय

  • प्रभाग क्रमांक ४ मध्ये तीन भाजप तर एक शिवसेना उमेदवार विजयी, भाजपच्या मुकेश मोकाशी, स्नेहा आंब्रे, आशादेवी सिंग आणि शिवसेनेच्या संजय पांडे यांचा विजय

  • प्रभाग २६ मध्ये एक राष्ट्रवादी, दोन काँग्रेस आणि एका अपक्षाचा विजय, राष्ट्रवादीचे अनिता किणे, काँग्रेसचे दिपाली भगत, कुरेशी यासीन अय्युब आणि अपक्ष विश्वनाथ भगत विजयी

  • प्रभाग २८ मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी, दीपक जाधव, दर्शना म्हात्रे, सुनिता मुंडे, रमाकांत मढवी विजयी

  • ठाण्याच्या प्रभाग १९मध्ये शिवसेनेचं पॅनल विजयी, मीनल संख्ये, नम्रता फाटक, विकास रेपाळे, नरेश म्हस्के विजयी

  • ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का, खासदार राजन विचारेंचे पुतणे मंदार विचारे पराभूत, पत्नी नंदिनी विचारे विजयी

  • प्रभाग १५ डमध्ये भाजपचे विलास कांबळे विजयी

  • प्रभाग १५ ब मधून शिवसेनेचे एकनाथ भोईर विजयी

  • प्रभाग १५ अ मधून भाजपच्या सुवर्णा कांबळे विजयी

  • प्रभाग २९मध्ये राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील आणि सलोचना पाटील विजयी

  • वॉर्ड ९ मध्ये शिवसेनेचे सगळे उमेदवार आघाडीवर

  • प्रभाग क्रमांक २०, २१, २२ च्या मतमोजणीच्या दुसऱ्या मशीनमध्ये बिघाड, दादोजी कोंडदेव सेंटरमधला प्रकार

  • ठाण्याच्या प्रभाग क्रमांक २९ सर्वसाधारण महिला मधून मनसेच्या पार्वती म्हात्रेंना प्रचंड आघाडी, विजयाच्या उंबरठ्यावर

  • राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील प्रभाग क्रमांक 29 मधून विजयी, आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमित भोईर यांचा केला पराभव

  • ठाण्यामध्ये शिवसेना 10, राष्ट्रवादी 3 आणि मनसे एका जागेवर आघाडीवर

  • प्रभाग क्रमांक २७ अ मध्ये शिवसेनेचे शैलेश पाटील आघाडीवर

  • दिव्यामध्ये मतमोजणीला सुरुवात, पहिल्या फेरीत कोणालाच स्पष्ट आघाडी नाही

  • ठाणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

  • ठाणे महापालिकेत एकूण १३१ वॉर्डांसाठी ३३ प्रभागांंमध्ये मतदान झाले असून ३२ प्रभागात ४ उमेदवार असून अखेरच्या ३३ क्रमांकाच्या प्रभागात ३ उमेदवार आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link