MVA Mumbai Morcha LIVE : महाविकास आघाडीच्या मोर्चात सरकारवर हल्लाबोल, राज्यपाल हटावचा नारा
MVA Mumbai Morcha LIVE Updates : महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल मोर्चा आहे. या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत.
MVA Mumbai Morcha LIVE Updates : महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल मोर्चा आहे. या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालय समोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. मविआचा तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे. मविआचे प्रमुख नेते मोर्चात सहभागी झालेत. आणि जे जे फ्लायओव्हरवरुन हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ येऊन थांबणार आहे. या मोर्चात समाजवादी पक्षाचे मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात हा हल्लाबोल मोर्चा.
Latest Updates
महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण एकटवलो - पवार
Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण सगळे एकटवलो आहोत, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले संयुक्त मोर्चेवेळी मोठे मोर्चे निघाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. सामान्य माणसांच्या मनावर एक नाव अखंड आहे, ते म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराज, असे पवार म्हणाले.पवार म्हणाले, ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे. महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. शिवाजी महाराज यांचं नावं आज साडे तीनशे वर्ष झाले तरी नावं अखंड आहे. आणि त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे. जर माफी मागितली गेली नाही तर हा तरुण शांत बसणार नाही. आजचे राज्यकर्ते महापुरुषांचा अपमान करतात मला विधान भवनात जाऊन 55 वर्षे झाली अनेक राज्यपाल मी पाहिले तत्कालीन राज्यपालांनी महाराष्ट्राच नावं लौकिक वाढवण्याच काम केलं. मात्र हे राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.
उद्धव ठाकरे यांचा सरकारवर निशाणा
Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीच्या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. सध्याचे पालकमंत्री मुंबईचा हिशोब स्क्वेअर फुटामध्ये करतात. संयुक्त महाराष्ट्रानंतरचा हा सर्वात मोठा लढा आहे. मी कोश्यारींना राज्यपाल मानत नाही. बेळगाव महाराष्ट्रात आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.राज्यपाल राष्ट्रपतीचे दूत असतात, मात्र त्याचा कोश्यारींना विसर. 'भीक' शब्दावरुन ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल ठाकरे यांनी चढवला. छत्रपतींचं नाव घेण्याचा लफंग्यांना अधिकार नाही. महाराजांची तुलना शिंदेंशी करणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांचा चांगलाच समाचार ठाकरे यांनी घेतला.Maha Vikas Aghadi Morcha Updates : मोर्चात अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. राज्यपाल कोश्यारी हटाव, असा नारा दिला. सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य होत आहेत. याला आळा घालण्याची गरज आहे. बेताल वक्तव्य रोखण्याची वेळ आली आहे. चूक झाल्यावर माफी मागितली जाते मात्र, या राज्यांत तसं दिसत नाही. भीक मागतात अशी वक्तव्ये करतात. मधल्या काळात पुणे सोलापूर बंद होतें त्याला कारण तसं आहे. आजचा कार्यकर्त्यांचा उत्साह पहाता सत्ताधारी गोटात धडकी भरल्याशिवाय रहाणार नाही. वादग्रस्त वक्तव्य होत आहेत एक कडक कायदा करण्याची गरज आहे. माझी मागणी आहे तत्काळ बिल आणा विरोधी पक्ष तुम्हाला पाठींबा देईल, असे पवार म्हणाले.
Maha Vikas Aghadi Morcha Updates : शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
- आजचा मोर्चाने राज्यपालांना डीसमिस केले आहे
- मोर्चाने इशारा दिला शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही
- महापुरुषांक्सह अपमान केलेल्यानाना सत्तेत बसायचा अधिकार नाही
- सत्ता उलथवण्यासाठीचे हे पहिले पाऊल
- रणनिती ठरली आहे, घोर युद्धासाठी सज्ज व्हायचय
- कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना आमच्या हातात द्या
- सरकार लटपटायला लागले आहे
- महाराष्ट्र एक आहे हे सांगायला मोर्चाMaha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकास आघाडीच्या मोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झालेत. मोर्चा सभास्थळी पवार उपस्थित. व्यासपीठावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते अजित पवार, नाना पटोले, संजय राऊत आदी नेते उपस्थित
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकास आघाडीच्या मोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झालेत.
Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीच्या मोर्चात महाराष्ट्र एकीकरण समितीही मोर्चात सामील झाली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील मोर्चात सामील झाल्यात. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले यांनी आपल्या पक्षाचे झेंडे खांद्यावर घेत मोर्चात सहभागी.
Maha Vikas Aghadi Morcha Updates : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील बेस्ट बस थांब्यावरुन पुढील सूचना मिळेपर्यंत बस वाहतूक बंद करण्यात आलेय. नागपाडा परिसरातून मोर्चा सुरु झालाय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सीएसएमटी बेस्ट थांबा बंद करण्यात आला आहे. प्रवाशांनी या बस थांब्यावर बससाठी थांबू नये, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात येत आहेत.
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येत आहे. तिन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शन होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी होण्यासाठी मातोश्रीवर बाहेर पडलेत.
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : मोर्चात मविआचे नेते सहभागी होत आहेत. यावेळी मविआच्या नेत्यांनी भाजप, शिंदे गटावर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणा-या राज्यपालांनी अजून माफी का मागितली नाही, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे. तर हा मोर्चा महाराष्ट्रद्रोह्यांच्याविरोधात असल्याचं नानो पटोले, अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा. विकेंड आणि मविआच्या महामोर्चामुळे वाहनांची गर्दी
बेळगावमधील नागरिक महामोर्चात सहभागी
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : बेळगाव महाराष्ट्रात आले पाहिजे यासाठी बेळगावमधील नागरिक महामोर्चात सहभागी झालेले आहेत त्यांनी बेळगाव निपाणी कारवार संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा आशयाच्या टोप्या घालून मोर्चात सहभागी झाले आहेत.
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल. मोर्चात उद्धव ठाकरे, शरद पवारही सहभागी होणार. दरम्यान, मविआच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलसांमध्ये बाचाबाची. रथ ठेवण्यावरुन वाद.
पाहा थेट LIVE मोर्चा
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates :मविआच्या मोर्चासाठी कल्याण, डोंबिवली , उल्हासनगर, बदलापूरहून राष्ट्रवादी काँग्रेसेचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं निघालेत. काही कार्यकर्ते खासगी वाहनांनी मोर्चात सहभागी होत आहेत. तर काही कार्यकर्ते ट्रेननं मुंबईला रवाना झालेत..
Maha Vikas Aghadi Morcha Updates : महामोर्च्यापूर्वी मविआच्या नेत्यांची मुंबई सेंट्रल येथील द साहिल हॉटेलवर बैठक. बैठकीनंतर सर्व नेते इथूनच मोर्चास्थळी जाणार आहेत. आतापर्यंत दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे,सुप्रिया सुळे, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात दाखल
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : आज महामोर्चा असल्याने मंत्रालय परिसरांत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. शासकीय सुट्टी असून ही मोठ्या प्रमाणात सुरक्षा आहे. खासगी वाहने बंद ठेवण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर सुरक्षा वाढवली आहे.
Maha Vikas Aghadi Morcha Updates : भायखळा या ठिकाणी सुरु होणाऱ्या महाविकास आघाडीच्या ठिकाणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले होते, हे पोस्टर मुंबई पोलिसांकडून करण्यात आले
शरद पवार मोर्चात सहभागी होणार
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सकाळी 11 वा. वाय बी चव्हाण सेंटर येथे जाणार आहेत. तसेच पवार थेट मोर्चा समारोप सभा ठिकाणी येणार आहेत.
मोर्चासाठी तिन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. तिन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी । महाविकासआघाडीच्या मोर्चासाठी मुंबई पोलीस सज्ज. 317 अधिकारी आणि 1870 कर्मचारी तैनात । मविआचे प्रमुख नेते 12 वाजेपर्यंत मोर्चाला येतील आणि जे जे फ्लायओव्हरवरून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलजवळ येऊन थांबणार आहे. या मोर्चात समाजवादी पक्षाचे मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची शक्यताय. महापुरुषांचा अवमान करणा-यांच्या विरोधात हा हल्लाबोल मोर्चा होणार आहे.
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : मोर्चा कशासाठी?
- शिवाजी महाराज, फुले-आंबेडकर यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणा-यांविरोधात
- महापुरुषांना वापरलेल्या अपशब्दांचा आणि वक्तव्य करणा-यांचा निषेध करण्यासाठी
- महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्य करणा-यांना पदावरुन हटवण्यासाठी
- राज्यातले प्रकल्प इतर राज्यात गेल्याचा जाब विचारण्यासाठी
- सतत वाढत असलेल्या महागाईविरोधात आवाज उठवण्यासाठी
- शेतक-यांना हक्काचा हमीभाव मिळवून देण्यासाठी
- आरक्षण, संरक्षण, सुविधा, शिक्षणासंदर्भातल्या प्रश्नांसाठी
- राज्यातले कष्टकरी कामगार आणि मजुरांच्या रखडलेल्या प्रश्नांसाठी
पुणे जिल्ह्यातूनही कार्यकर्ते मुंबईत दाखल
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकासआघाडीकडून राज्य सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात येतोय. त्यासाठी पुणे जिल्ह्यातूनही कार्यकर्ते दाखल होतायत. पुण्याच्या केसनंद गावातून मोहन यादव हे आपला मुलगा उद्धवसह बाईकचा रथ करुन मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झालेत. तसेच बारामतीमधूनही कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत.
पुणे जिल्ह्यातूनही कार्यकर्ते मुंबईत दाखल
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकासआघाडीकडून राज्य सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात येतोय. त्यासाठी पुणे जिल्ह्यातूनही कार्यकर्ते दाखल होतायत. पुण्याच्या केसनंद गावातून मोहन यादव हे आपला मुलगा उद्धवसह बाईकचा रथ करुन मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झालेत.
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : नाशिकमधून कार्यकर्ते मविआच्या हल्लाबोल मोर्चासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेयत...यावेळी हजारो कार्यकर्ते मुंबईत येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबईत 2500 पोलीस बंदोबस्तासाठी
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकास आघाडीच्या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत अडीच हजार पोलीस बंदोबस्त होणार तैनात करण्यात आलेत.
Maha Vikas Aghadi Morcha LIVE Updates : 10 च्या सुमारास जे जे ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार. महामोर्चासाठी 10वाजण्याच्या सुमारास ब्रिजवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सध्या वाहतूक सुरळीत सुरु आहे.
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : मोर्चासाठी वाहतूक बदल करण्यात आले असून पर्यायी मार्ग असे असणार आहेत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी चिंचपोकळी पुलावरून ऑर्थर रोड-सात रस्ता सर्कल - मुंबई सेंट्रल - डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग - ऑपेरा हाऊस महर्षी कर्वे रोडचा (क्वीन्स रोड) वापर करावा. किंवा सात रस्ता सर्कल - मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल - नाना चौक एन. एस. पुरंदरे मार्ग या मार्गाचासुद्ध वापर करावा.
- भायखळा येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता डॉ. बी. ए. रोड खडा पारसी नागपाडा जंक्शन- दोन टाकी जंक्शन- जे. जे. जंक्शन महम्मद अली रोड याचा वापर करावा. किंवा नागपाडा जंक्शन मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल- नाना चौक- एन. एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
- लालबाग येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता बावला कम्पाउंड टी.बी. कदम मार्गाने व्होल्टास कंपनी उजवे वळण तानाजी मालुसरे मार्ग अल्बर्ट जंक्शन-उजवे वळण बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करावा.
- मध्य मुंबईकडून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता आर. ए. किडवाई मार्गाने बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पी.डीमेलो रोडचा वापर करावा.
- नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता देवनार आयओसी जंक्शन पूर्व मुक्त मार्ग पी. डिमेलो रोडचा वापर करावा. किंवा नवी मुंबई व पुणे येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता चेंबूर पांजरपोळ जंक्शन पूर्व मुक्त मार्ग पी. डिमेलो रोड याचा वापर करावा.
- दक्षिण मुंबई येथून उत्तर आणि पश्चिम मुंबईकरिता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन जगन्नाथ शंकर शेठ रोड- प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पूल मरिन ड्राइव्ह मार्ग याचा वापर करावा.
- दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबई तसेच नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिककरिता पी.डिमेलो रोडचा वापर करून पूर्व मुक्त मार्ग इच्छितस्थळी जाऊ शकतात.
- दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबईकरिता मरिन ड्राइव्ह - ऑपेरा हाऊस - लिमॅंग्टन रोड - मुंबई सेंट्रल सात रस्ता चिंचपोकळी डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा. महर्षी कर्वे रोड / मरिन ड्राइव्ह नाना चौक ताडदेव सर्कल मुंबई सेंट्रल सात रस्ता चिंचपोकळी किंवा डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा.
- सीएसएमटी स्टेशनकडून पायधुनी, भायखळा, नागपाडा येथे जाण्याकरिता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन- एल. टी. मार्ग चकाला डावे वळण जी.जे. जंक्शन दोन टाकी नागपाडा जंक्शन खडा पारसी जंक्शनपुढे जाता येईल.
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यातून त्यांचा केलेला अवमान, बेरोजगारी अशा असंख्य गोष्टींचा जाब या राज्य सरकारला विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून 'महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल' हा मोर्चा पुकारण्यात आला आहे. याचा एक टिझर प्रकाशित करण्यात आलाय.
मविआच्या मोर्चासाठी वाहतुकीत बदल
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : मोर्चाच्या ठिकाणच्या मार्गिका वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. मुंबईकरांनो पर्यायी मार्गांचा करा वापर, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे. मविआच्या महामोर्चासाठी मार्गात बदल केलेयत. रिचर्डसन्स क्रुडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल डॉ. दादाभाई नौरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गिका बंद असतील. भायखळ्यातून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या मार्गात बदल केलाय. भायखळा, लालबागमधूनही दक्षिण मुंबईकडे जाणा-या मार्गात बदल केला आहे.
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल मोर्चा आहे. (Maharashtra Political News) या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालय समोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरुवात होणार आहे. मविआचा तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे. मविआचे प्रमुख नेते 12 वाजेपर्यंत मोर्चाला येतील आणि जे जे फ्लायओव्हरवरुन हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ येऊन थांबणार आहे. या मोर्चात समाजवादी पक्षाचे मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची शक्यताय. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात हा हल्लाबोल मोर्चा होणार आहे.
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाराष्ट्राचा वारंवार अपमान करणाऱ्या महाराष्ट्रविरोधी लोकांविरुद्ध महाविकास आघाडीच्या विशाल मोर्च्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. (Maharashtra Political News) आज सकाळी हा विराट मोर्चा निघणार आहे. तयारीला लागा, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.