Shiv Sena Symbol EC Hearing LIVE : पुढील सुनावणी आता 30 जानेवारीला होणार
Dhanushyaban Hearing News : धनुष्यबाण (Dhanushyaban) कुणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा याचा अंतिम फैसला आता 30 जानेवारीला होणार आहे. (Shiv Sena) आज केंद्रीय निवडणूक आयोगात दोनही गटाच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. निवडणूक आयोगाने दोनही गटांना सोमवारी लेखी उत्तर देण्याचं सांगितलं आहे.
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Political News) धनुष्यबाण (Dhanushyaban) कुणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा याचा अंतिम फैसला आता 30 जानेवारीला होणार आहे. (Shiv Sena) आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पूर्ण झाली. (Uddhav Thackeray) निवडणूक आयोगाने दोनही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांचा आज युक्तीवाद पूर्ण झाला. आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर आयोग 30 जानेवारील अंतिम निर्णय देणार आहे. (Eknath Shinde)
Latest Updates
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोनही गटांना सोमवारी लेखी उत्तर देण्यास सांगितलं आहे. सोमवारी लेखी उत्तर आल्यावर निवडणूक आयोग निकालाची तारीख देणार
दोन्ही गटांचा युक्तीवाद आजच संपणार; आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : तब्बल तीन तासांनंतर निवडणूक आयोगासमोर सुरु असलेला ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपला आहे. त्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आयोगासमोर युक्तिवाद करण्यात सुरुवात केली आहे. काहीच वेळात युक्तीवाद पूर्ण होऊन महत्त्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगासमोरच शिंदे, ठाकरे गटामध्ये खडाजंगी; आयुक्तांना करावी लागली मध्यस्थी
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत प्रतिनिधी सभेवरुन केलेल्या युक्तीवादावरुन शिंदे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या युक्तीवादावरुन शिंदे गटाचे वकील जेठमलानींनी आक्षेप घेतला आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी निवडणूक आयोगाला मध्यस्थी करावी लागली. प्रतिनिधी सभा उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याने त्यांच्याच हा पक्ष असू शकतो असे कामत यांनी म्हणताच वकील जेठमलानी यांनी आक्षेप घेतला.
प्रतिनिधी सभा ठाकरे गटाकडेच; वकील देवदत्त कामत यांचा युक्तीवाद
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगासमोरील युक्तिवाद संपल्यानंतर ते कोर्टातून निघून गेले आहेत. यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू केला आहे. शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य असल्याचे म्हणत प्रतिनिधी सभा ठाकरे गटाकडेच असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे. मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही, असेही देवदत्त कामत म्हणाले
...म्हणून शिंदे गट राजकीय पक्षच नाही; ठाकरे गटाचा मोठा दावा
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : आम्ही प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारणीसाठीची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडे पूर्ण केली आहे. मात्र शिंदे गट स्वतःला राजकीय पक्ष म्हणवत असला तरीही त्यांनी अशी कोणत्याही गोष्टींची पूर्तता केलेली नाही, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे सिब्बल यांनी शिंदे गट राजकीय पक्ष नाही असा मोठा युक्तीवाद केला आहे.
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर महत्त्वाचे दोन अर्ज
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली आहे. यावेळी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यासोबत आम्हाला प्रतिनिधी सभा घेण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे. तसेच नेता निवडीसाठीदेखील परवानगी द्यावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. नेता निवडीसाठी ठाकरे गटाने अर्ज दाखल केल्याचे तपशील दाखल केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
सुनावणीला सुरुवात; कपिल सिब्बल यांनी सुरु केला युक्तिवाद
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : निवडणूक आयोगासमोर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटामध्ये शिवसेनेच्या पक्षचिन्हाच्या हक्कावरुन सुरु असलेल्या वादाची सुनावणी सुरु झाली आहे. ठाकरे गटाने युक्तिवादासाठी तीन तासांची वेळ मागण्यात आली आहे. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवादाला सुरुवात केली आहे. तर शिंदे गटाकडून राम जेठमलानी हे अर्धा तास युक्तिवाद करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखला निवडणूक आयोगासमोर ?
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : काल पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत केलेलं वक्तव्य निवडणूक आयोगासमोर मांडले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गट मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाचा उल्लेख करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कालच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्ही मोदींचेच असल्याचं परदेशात सांगितले, असा दाखला दिला होता. ठाकरे गटाचे वकील मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप निवडणूक आयोगासमोर दाखवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे कोणाचे आहेत आणि ते कोणाचे होते हे स्पष्ट झाले - देसाई
Anil Desai On Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : आधीच्या सुनावणीनंतर आज पुन्हा सुनावणी आहे. कपिल सिब्बल आमची बाजू मांडणार आहेत.आमची मागणी आहे की, यावर योग्य न्याय व्हावा, अशी अपेक्षा ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे. पक्ष प्रमुख पदाची निवडणूक आणि राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात अर्ज दिला आहे. त्यावर निवडणूक आयोगानं निर्णय द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे कालच म्हणाले की ते कोणाचा माणूस आहे. शिंदे कोणाचे आहेत आणि ते कोणाचे होते हे स्पष्ट झाले आहे. कशा प्रकारचा डाव होता, पक्षाला कसं फसवले गेलेय, ते पुढे आले आहे. शिवसेनेत दोन गट पडून वाद असल्याचं दाखवलं गेले यावर ही युक्तीवाद होईल, असे देसाई यांनी म्हटले आहे.
घाईघाईने निर्णय देऊ नये अशी ठाकरे गटाची मागणी
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : धनुष्यबाण कुणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा याचा अंतिम फैसला आज होण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर आयोग आजच निर्णय देण्याची शक्यता आहे. १७ जानेवारीला झालेल्या सुनावणीत आयोगासमोर कागदपत्रांवरून शिंदे आणि ठाकरे गटाने जोरदार युक्तीवाद केला. घाईघाईने निर्णय देऊ नये अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. त्यामुळे आता आयोगाने आज पुन्हा दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे.
'फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना होत नाही'
Ambadas Danve on Dhanushyaban Symbol Election Commission Hearing : शिवसेनेकडून होणारा युक्तीवाद जनतेच्या मनातला आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. शिवसेनेकडून होणारा युक्तीवाद जनतेच्या मनातून आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मागे शिवसैनिक आहेत. फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना होत नाही, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. शिवसेना धनुष्यबाण चिन्हाविषयीची सुनावणी कोर्टात झाली तर शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल, असा दावा यावेळी अंबादास दानवे यांनी केला आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करते की काय, असा जनतेच्या मनात संशय निर्माण होत असल्याचेही दानवे म्हणाले.
शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत काय होणार?
Shiv Sena Dhanushyaban Symbol EC Hearing : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. (Maharashtra Political Crisis) दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आज शुक्रवारी फैसला होण्याची शक्यता आहे. त्याआधी निवडणूक आयोगाने मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाला पेटती मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार निशाणी दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे.
दोन्ही गटाकडून मोठा दावा
Shiv Sena Dhanushyaban Symbol EC Hearing : दरम्यान, शिवसेना कोणाची हा वाद सुरु असताना जर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला संघटनात्मक निवडणुकीला परवानगी दिली तर ठाकरे गटाच्या अस्तित्वाला मान्यता दिल्यासारखे होईल. त्यामुळे आज निवडणूक घेण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे किंवा नाही, याची मोठी उत्सुकता आहे. तसेच धनुष्यबाण चिन्हाबाबत काय फैसला होणार याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, मूळ शिवसेनेच्या एबी फॉर्मवर शिंदे गटातील आमदार निवडून आले आहेत. याबाबत मागच्या सुनावणीवेळी ठाकरे गटाने मजबूत युक्तिवाद केला होता. ठाकरे गटाने शिवसेनेच्या संविधानाचा हवाला देत शिवसेनेच्या संविधानात मुख्य नेता पदच नाही, असा दावा केला होता. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. तर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावरच आक्षेप घेतला होता.
ठाकरे पक्षप्रमुख पदावर राहणार का?
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ येत्या 23 जानेवारी रोजी संपत आहे आहे. त्यामुळे ठाकरे गटाने प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. त्यावरही निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला नाही. निवडणूक आयोग आज त्यावरही निर्णय देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
धनुष्यबाण कुणाचा?, काय झाला युक्तीवाद...
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : धनुष्यबाण कुणाचा ठाकरे यांचा की शिंदे यांचा या प्रश्नाभोवती गेल्या चार महिन्यांपासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. तर शिंदे गटाकडूनही वकिलांची मोठी फौज युक्तिवादासाठी हजर होती. 'शिंदे गटाने दाखल केली कागदपत्र ही जुनी आहे, महेश जेठमलानी यांनी केलेला दावा हा बोगस आहे. शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही त्यामुळे ही फूट ग्राह्य धरू नये. ही फूट काल्पनिक असू शकते. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच ही खरी शिवसेना आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता.
मूळ शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार?
Shiv Sena Dhanushyaban Symbol Election Commission Hearing : शिवसेना कुणाची, उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, याचा आज फैसला होणार आहे. मूळ शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला देणार याची उत्तरे आज मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी कागदपत्रं सादर केल्यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय देतं याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुका घेण्यासाठी आणि प्रतिनिधी सभा बोलावण्यासाठी परवानगी देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.