Turkey Earthquake LIVE : तुर्कीला भूकंपाचा तिसरा धक्का! मृतांची संख्या 1900 हून अधिक; आणखीन धक्के बसण्याची शक्यता

Mon, 06 Feb 2023-7:45 pm,

Turkey Earthquake LIVE : तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला असून अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. इमारतीखाली दबल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुपारच्या सुमारास तुर्कीला दुसरा भूकंपाचा धक्का बसला.

Turkey Earthquake LIVE Updates: शक्तिशाली भुकंपाने तुर्की (Turkey Earthquake) हादरलं असून मोठा हाहाकार उडाला आहे. आलेला भूकंप 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. भूकंपाचा हादरा इतका जबरदस्त होता की, अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळल्या. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असल्याने मृतांचा (Turkey Earthquake Death) आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळांवर युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. लेबनॉन (Lebanon), सीरिया (Syria) आणि सायप्रसमध्ये (Cyprus) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आतापर्यंत या भूकंपानं 195 नागरिकांचा बळी घेतला आहे तर हजारो नागरिकांना बेघर केलं आहे. 


 

Latest Updates

  • Over 1900 dead in 3 Eartquakes:
    सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास 6 रिश्टर स्केलच्या भूकंपाने तुर्की दिवसभरामध्ये तिसऱ्यांदा हादरला. अमेरिकेतील जिओलॉजिकल सर्वेनं ही माहिती दिली. अशाप्रकारेच अनेक ऑफरशॉक पुढील काळात पहायला मिळतील असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान मृतांची संख्या 1900 हून अधिक झाली आहे.

  • Turkey, Syria quake death toll set to jump: WHO
    जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे रिजनल इमर्जन्सी डायरेक्टर रिक ब्रेनान यांनी "मला वाटतं की मृतांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढेल," असं रॉयटर्सची बोलताना सांगितलं. "अनेक इमारतींची पडझड झाल्याने लोक अडकून पडले असणार. त्यामुळेच मृतांची संख्या वाढू शकते," असं ब्रेनान म्हणाले.

  • India to Help Earthquake Hit Turkey: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाच्या नेृत्वाखाली सोमवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये तुर्कीला मदत करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. तुर्की सरकारबरोबर समन्वय साधून एनडीआरएफ आणि वैद्यकीय तुकड्या भारतातून तुर्कीला पाठवण्यात येणार आहे. 

  • Second quake of 7.5 magnitude hits Turkey: तुर्कीला 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा दुसरा धक्का. इकिनोझू शहरापासून 4 किमी अंतरावर असलेल्या शहरामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू. अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेनं वृत्ताला दिला दुजोरा. रिसेप तय्यिप एर्दोगान यांनी दिली माहिती. 2 हजार 470 जणांची करण्यात आली सुटका. एकूण 2 हजार 818 इमारतींची पडझड

  • Turkey Earthquake LIVE Updates: तुर्कीच्या भूकंपानंतर Ceyhan Oil Terminal ने ऑपरेशन थांबवलं - शिपिंग एजन्सी

    तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपानंतर Ceyhan Oil Terminal ने आपलं कामकाज थांबवलं आहे. Tribeca shipping agency ने ही माहिती दिली आहे. यासंबंधी लवकरच आपातकालीन बैठक बोलावली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

    पाईपलाइन ऑपरेटर BOTAS ने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य पाईपलाइनला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. Tribeca ने सांगितल्यानुसार, तुर्कीच्या दक्षिणपूर्व भागातील बंदरांची भूकंपामुळे हानी झाली आहे. याचा कामकाजावर परिणाम झाला आहे. 

  • Turkey Earthquake LIVE Updates: 1710 इमारती कोसळल्या, 600 लोक ठार

    तुर्की आणि सीरियामधील मृतांचा आकडा 600 वर पोहोचला आहे. ही संख्या हजाराच्याही वर जाण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे तब्बल 1710 इमारती कोसळल्या असून प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. तुर्कीने यानंतर मदत मागितली आहे.

  • Turkey Earthquake LIVE Updates: इटलीने त्सुनामीचा इशारा फेटाळला

    तुर्कीमधील भूकंपानंतर दक्षिण इटलीसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. पण इटालियन अधिकाऱ्यांनी भीतीचं कारण नाही सांगत धोका कमी झाल्याचं म्हटलं आहे. तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. 

     

  • Turkey Earthquake LIVE Updates : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

    'भारत तुर्कस्तानच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे, शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे', असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 

    "तुर्कस्तानमधील भूकंपामुळे झालेली जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान यामुळे आपल्याला दु:ख झाले आहे. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांप्रती आपल्या संवेदना आहेत. जखमी जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. भारत तुर्कस्तानच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि या दु:खद घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे," असं मोदी म्हणाले आहेत. 

  • तुर्की आणि सीरियातील मृतांचा आकडा 195 वर

    तुर्कीमधील आपातकालीन सेवेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सात प्रांतातील किमान 76 लोकांचा मृत्यू झाला असून 440 लोक जखमी झाले आहेत. दरम्यान सीरियातील मृतांची संख्या 99 वर पोहोचली आहे. तसंच 334 लोक जखमी झाले आहेत. याआधी सीरियातील बंडखोर प्रांतातील 20 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. म्हणजे सीरिया आणि तुर्कीमधील 195 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

  • तुर्कीमधील आपातकालीन सेवेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात सात प्रांतातील किमान 76 लोकांचा मृत्यू झाला असून 440 लोक जखमी झाले आहेत.

     

  • भूकंपात मृत्यू झालेल्यांचा आकडा 53 वर पोहोचला आहे. घटनास्थळांवर बचावकार्य सुरु असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

  • जानेवारी 2020 मध्ये Elazig येथे 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये, Aegean समुद्रात 7.0 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामध्ये 114 लोक ठार आणि 1,000 हून अधिक जखमी झाले होते.

     

  • तुर्की जगातील सर्वात सक्रिय भूकंप क्षेत्रांपैकी एक आहे. 1999 मध्ये तुर्कीत सर्वात मोठा भूकंप आला होता. Duzce प्रांतात हा भूकंप आला होता. या भूकंपात तब्बल 17 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये इस्तानबूलमधील 1000 लोकांचा समावेश होता. सुरक्षिततेची खबरदारी न घेता मोठ्या इमारतींना परवानगी दिलेल्या इस्तांबूलचा मोठ्या भूकंपामुळे विनाश होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

     

  • गझियानटेपचा सीरियाला लागून असणारा दक्षिणेकडील प्रदेश आहे. हा तुर्कस्तानच्या प्रमुख औद्योगिक आणि उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. AFP च्या वृत्तानुसार,, लेबनॉन (Lebanon), सीरिया (Syria) आणि सायप्रस (Cyprus)मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 

     

  • स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. सुमारे 17.9 किलोमीटर (11 मैल) खोलीवर हा भूकंप झाला. दरम्यान USGS ने 15 मिनिटांनंतर पहिल्या ठिकाणी पुन्हा 6.7-रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद केली.

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link