मुंबई : मध्य रेल्वेच्या मंकी हिल ते कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तांत्रिक कामांसाठी अप मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर मुंबई- कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार आहे. तसं काही गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी देखील १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत पुणे ते मुंबई ते पुणे प्रगती एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली होती. याआधीही याच घाट क्षेत्रात कामे घेण्यात आली होती.


त्यामुळे पुन्हा आरक्षण करुन प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.