चंद्रपूर : मजुरांच्या टाटा मॅजिक वाहनाला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कोरपना-वणी मार्गावर हेटी गावाजवळ झालेल्या या अपघात १० जण ठार झालेत. यात ७  महिला २  पुरुष आणि एका बालकाचा यात समावेश आहे. तर अपघातात  ४  जखमी झालेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 टाटा मॅजिक वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. जखमींना कोरपना रुग्णालयात हलविलण्यात आले आहेत. जखमींवर सुरू आहेत उपचार, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.


टाटा मॅजिकमध्ये १५ प्रवासी होते. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला तर चार व्यक्ती जखमी आहेत. या जखमींना कोरपना येथील प्राथमिक उपचारांसाठी ग्रामिण रुग्णालय येथे आणण्यात आले आहेत.