बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून दगावल्यांची संख्या आता १० वर पोहचलीय. रविवारी परतीच्या पावसानं पुन्हा एकदा कहर केला. नांदुरा तालुक्यात दुपारी जोरदार पाऊस पडला. मात्र पावसापूर्वी वडनेर भोलजी येथे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्यभामा इंगळे असं मृत महिलेचं नाव आहे. तर पोटळी येथे अनिल हुंबरडे या शेतक-याच्या 2 जर्सी गाई ठार झाल्यात. तर जिल्ह्यात ठिकठिकाणी 5 जण वीज पडून जखमी झालेत.