नाशिक : धक्कादायक घटना. अवघ्या १० वर्षीय अनिकेत मोकाशे याने आत्महत्या केली. आई शाळेत जायला सांगते या रागातून त्याने ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई शाळेत जायला सांगते याचा राग येऊन अवघ्या दहा वर्षांच्या मुलानं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय. नाशिकमधल्या वडाळा इथली ही धक्कादायक घटना आहे. अनिकेत योगेश मोकाशे असं आत्महत्या केलेल्या दहा वर्षांच्या मुलाचं नाव आहे. अनिकेत वडाळा गावातल्या के बी एच शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होता.