नाशिक : नाशिक येथील ४८ वर्षीय योग प्रशिक्षिका प्रज्ञा पाटील आता १०१ तास योगा करण्याचं गिनीज रेकोर्ड आज पूर्ण केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१६ जूनला इगतपुरीतल्या ग्रँड गार्डन रिसोर्टमध्ये तिनं योगा करायला सुरूवात केली होती. काही वेळापुर्वी म्हणजे ९ वाजून ३० मिनिटांनी १०१ तास योगा करून त्यांनी हा विक्रम प्रस्थापित केलाय. 


यापूर्वी महिलांमध्ये भारतातील तामिळनाडू येथील के. पी. रचना या महिलेनं केलेला ५७ तासांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. आता हा रेकॉर्ड प्रज्ञा पाटील यांच्या नावे जमा झालाय. 


तसंच कॅनडा येथील यास्मिन गो या महिलेने ३३ तासांचा तर पुरुषांमध्ये डॉ. व्ही. गणेशकरण यांचा ६९ तासांचा अविरत योग करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आता प्रज्ञाने ब्रेक केलाय. 


उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर चाळीशी ओलांडलेल्या महिलेने केलेला हा विक्रम घरातील आणि नोकरदार महिलांना प्रेरणादायी असा ठरणार आहे.