दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : कोरोनाच्या संकटात निधी अभावी राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी अद्याप होऊ शकली नाही.कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच कर्जाचा बोजा असल्याने त्यांना नवं कर्ज मिळणं अवघड आहे. अशावेळी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे साधारण ११ लाख शेतकर्‍यांना नवं कर्ज मिळू शकणार आहे. महत्वाचे म्हणजे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना देखील खरीपाचे नवं कर्ज मिळणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. यांच्या थकीत कर्जाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. 


हे वाचा : Good News । रेपो दरात कपात, गृह कर्जाचा EMI होणार कमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या थकीत ११.१२ लाख शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी नवं कर्ज देण्याच्या सूचना राज्य सरकारने बँकांना दिल्या आहेत. या शेतकर्‍यांच्या कर्जाची थकीत रक्कम राज्य सरकारच्या नावे करून शेतकऱ्यांना नवं कर्ज देण्याचा यामध्य स्पष्ट उल्लेख आहे. 


हे वाचा : शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा


यामुळे ११.१२ लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यातील ८१०० कोटी रुपये राज्य सरकार व्याजासह बँकांना देणार आहे. 



महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. राज्यातील ३२ लाख शेतकर्‍यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. या ३२ लाखांपैकी मार्च २०२० अखेरीस १९ लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये १२ हजार कोटी रुपये सरकारने भरले आहेत. 


मात्र निधी अभावी ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी होऊ शकली नव्हती.या खातेदारांना ८१०० कोटी लाभ देणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना आता सरकारने दिलासा दिला आहे.