यवतमाळ : Cooler shock 11-year-old boy : कुलरचा वापर करताना सावधानता बाळगा. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. कुलरचा शॉक लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ही घटना घडली. कुलर सुरु असताना सफाई करताना हा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलर वापरताना काळजी घेतली नाही तर अशी दुर्दैवी घटना घडू शकते. कुलरमध्ये अडकलेला कचरा काढताना शॉक लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील सावर इथं ही दुर्घटना घडलीय. संकल्प ढवळे असे मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. 


घरात कुलर सुरु होता. त्यावेळी कुलरच्या टपातील बंद पडलेलं छिद्र संकल्प साफ करत होता. त्यावेळी त्याला विजेचा जोरदार झटका बसला. शेजारीच असलेल्या आजोबांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ कुलर बंद केला. मात्र तोपर्यंत संकल्पचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे नागरिकांनी कुलरचा वापर करताना खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचं अधोरेखित झाले आहे.  


कुलर वापरताना काय काळजी घ्यावी  


- ओल्या हाताने पंप सुरु करु नये
- पंपातून पाणी येत नसेल तर वीज प्रवाह बंद करावा
- पंप आणि वायर पाण्यात बुडली नसल्याची खात्री करावी
- पंपाचे आर्थिंग योग्य असल्याचं तपासून घ्यावे