11th Admission Maharashtra : बारावी आणि दहावीचा निकाल लागला. आता विद्यार्थी आणि पालकांना वेध लागेल आहे ते प्रवेशाबद्दल...अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. त्यासाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पालकानो आणि विद्यार्थ्यांनो अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या या तारखा नोंद करुन ठेवा. (FYJC 11th Online Admission)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरात इयत्ता 11वीचे प्रवेश 2023-24 साठी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर इतर शहरांमध्ये स्थानिक आणि कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरावर प्रवेश करण्यात येणार आहे. (11th Centralise Online admission process 2023-24)


'या' पोर्टलवरुन करा अल्पाय 


11वीचे केंद्रीय ऑनलाईन प्रवेशसाठी https://11thadmission.org.in हे पोर्टल वापरायचे आहे. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना शहर निवडावे लागणार आहे. त्याशिवाय प्रवेशासाठी आवश्यक गोष्टींची नोंद करायची आहे. (11th admission fyjc online admission check full time table Note the important dates admission process 11th admission in maharashtra)


कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी (Quota Admission Schedule)


जर तुम्हाला कोट्यातर्गंत प्रवेश करायचा असेल तर 8 जून 2023 ला सकाळी 10 वाजल्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया 12 जून 2023 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही करु शकणार आहात. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदविणेची सुविधा (Apply for Quota) विद्यार्थी लॉग इनमध्ये देण्यात आली आहे. 


कोटवार गुणवत्ता यादी कधी जाहीर होणार ?


13 जून 2023 ही तारखी लक्षात ठेवा या दिवशी विद्यार्थ्यांची कोटवार गुणवत्ता यादी तयार होणार आहे. ही यादी यादी विद्यालय स्तरावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. अशा स्थितीत ज्या विद्यार्थ्यांचं यादीत नाव आहे. त्या विद्यार्थ्यांना कॉलेज फोन करुन माहिती देणार आहेत. 


'या' तारखेमध्ये प्रवेश निश्चित करा!


विद्यार्थ्यांना कॉलेजमधून फोन आल्यानंतर 13 जून 2023 ते 15 जून 2023 सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे. (व्यवस्थापन, इनहाऊस आणि अल्पसंख्यांक) त्याशिवाय विद्यालयांना व्यवस्थापन कोटा आणि इन-हाऊस कोटा यामधील रिक्त जागा CAP कडे प्रत्यार्पित करावे लागणार आहे. 


कोटानिहाय रिक्त जागेबद्दल 'या' तारखा लक्षात ठेवा!


16 जून 2023 ते 18 जून 2023 दरम्यान कोटानिहाय रिक्त जागा विद्यालय स्तरावर जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या तारख्यांमध्ये कोटा प्रवेशासाठी यापूर्वी नोंदवलेली पसंती विद्यार्थी किंवा पालक बदलू शकणार आहेत. 


अकरावीची पहिली प्रवेश यादी कधी?


विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो अकरावी प्रवेशची पहिली (कोटावार गुणवत्ता) यादी ही 19 जून 2023 ला जाहीर होणार आहे. ही यादी विद्यालय स्तरवार जाहीर करण्यात येणार आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी कॉलेजमधून फोन करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना 19 जून 2023 सकाळी 10 वाजल्यापासून ते 22 जून 2023 सायंकाळी 6 पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. 


कोणत्याही कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरल्यास आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी Apply केलेले आहे आणि ते प्रवेश घेऊ इच्छितात ते विद्यार्थी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधून आपला कोटाअंतर्गत प्रवेश निश्चित करु शकतात.


तर 22 जून 2023 रात्री 8 पर्यंत उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी कोट्यातील रिक्त जागा CAP कडे समर्पित करावी लागणार आहे. तर 23 जून 2023 ला कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर कोटानिहाय रिक्त जागा जाहीर कराव्या लागणार आहेत.