१३ लाखांचे बोकड चोरीला गेल्याची घटना
बुलडाणा जिल्ह्यात १४ बोकड चोरीला गेल्याची घटना घडली.
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात १४ बोकड चोरीला गेल्याची घटना घडली. लोणार तालुक्यातील शारा या गावानजीकच असलेले डॉ. अनिल मापारी यांच्या शेतातील असलेल्या नंदनवन गोट फार्ममध्ये ही घटना घडली.
चोरीला गेलेल्या बोकडांची किंमत सुमारे १३ लाख रुपये इतकी आहे..तर चोरट्यांनी तिथे पाळलेल्या कुत्र्यां सुद्धा मारून टाकलं. या अगोदर वडगाव तेजन इथल्या सिरसाट यांच्या गोट फार्म मध्येही अशीच चोरीची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडलाय.
डॉ. मापारी जवळपास १२ वर्षांपासून हा व्यवसाय करतात. विशेष म्हणजे या गोट फार्मला पाहण्यासाठी परराज्यातून सुद्धा अनेक लोक येतात. या चोरी प्रकरणी लोणार पोलीस स्टेशनला गुन्हा दखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.